ब्रेकिंग

सॅफ्रॉन सफायर आयडॉल गायन स्पर्धेचे ३० जानेवारी रोजी आयोजन

गायक कलावंतांना २४ जानेवारीपर्यंत सहभाग नोंदविता येणार

सॅफ्रॉन सफायर आयडॉल गायन स्पर्धेचे ३० जानेवारी रोजी आयोजन

गायक कलावंतांना २४ जानेवारीपर्यंत सहभाग नोंदविता येणार
संगमनेर । प्रतिनिधी । लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्थानिक गायक कलावंतांसाठी सॅफ्रॉन सफायर आयडॉल सोलो गायन स्पर्धेचे आयोजन ३० व ३१ जानेवारी 2025 रोजी मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड येथे करण्यात आले असल्याचे प्रकल्प प्रमुख संदीप चोथवे, सुनिता मालपाणी, प्रशांत रूणवाल यांनी सांगितले आहे. युनिकॉल अडेजिव्ह आणि मालपाणी ग्रुप यांनी या स्पर्धेचे प्रायोजकत्व घेतले आहे. अनेक स्थानिक व गुणवंत कलाकारांना आपली गायन कला सादर करता येणार असून भविष्यातील उत्कृष्ट गायक बनण्याची सुवर्णसंधी त्यांना या निमित्ताने प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन लायन्स क्लब संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष व माजी प्रांतपाल श्री. गिरीश मालपाणी व माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी यांनी केले. क्लबच्या अध्यक्षा स्वाती मालपाणी, सेक्रेटरी प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, खजिनदार पूजा मर्दा यांनी स्पर्धकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सॅफ्रॉन सफायर आयडॉल सोलो गायन स्पर्धेचे हे १० वे वर्ष आहे. सफायर आयडॉल स्पर्धा विद्यालय स्तर, महाविद्यालय स्तर व खुला गट अशा एकूण 5 गटात  संपन्न होणार आहे.  पहिला गट तिसरी ते पाचवी, दुसरा गट सहावी ते सातवी, तिसरा गट आठवी ते दहावी, चौथा गट महाविद्यालयीन विद्यार्थी तर पाचवा गट खुला गट असणार आहे. प्रत्येक गटात एकूण सहा बक्षिसे असून पहिल्या क्रमांकास रू. १५०० व ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकास रू. ११०० व ट्रॉफी, तिसऱ्या क्रमांकास रू. ७५० व ट्रॉफी, चौथ्या क्रमांकास रू. ५०० तर दोन उत्तेजनार्थ बक्षिसांना प्रत्येकी रू. ३०० असे स्वरूप असणार आहे.प्रत्येक ग्रुपमधून सफायर सुपर आयडॉल ४ स्पर्धकांचे लायन्स संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या युट्यूब चॅनेलला व्हिडिओ अपलोड होणार असून जास्तीत जास्त लाईक्स मधून पॉप्युलर ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धकांसाठी प्रवेश फी 100 रू. ठेवण्यात आली आहे. २४ जानेवारीपर्यंत स्पर्धकांना सहभाग नोंदविता येणार असून ऑडिशन २४ जानेवारी रोजीच दुपारी ३ वाजता मालपाणी लॉन्स येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी ऑडिशन देणे गरजेचे असून त्यातून स्पर्धक निवडणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्व उपस्थितांना मोफत प्रवेश आहे.
नाव नोंदणीसाठी कृष्णा कलेक्शन, सह्याद्री कॉलेज समोर (मोबा. 9422792073), श्री सिध्दीविनायक कॉर्पोरेशन (02425) 220803, प्रा. डॉ. जितेंद्र पाटील (9860286123) यांना संपर्क करण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख संदीप चोथवे यांनी केले आहे.  सदर स्पर्धेसाठी लायन्स सॅफ्रॉन सफायरचे सदस्य मेहनत घेत आहेत.

 २४ जानेवारी २०२५ ला ऑडिशन
२४ जानेवारीपर्यंत स्पर्धकांना सहभाग नोंदविता येणार असून ऑडिशन २४ जानेवारी रोजीच दुपारी ३ वाजता मालपाणी लॉन्स येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी ऑडिशन देणे गरजेचे असून त्यातून स्पर्धक निवडणार आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!