संघर्षाला जगण्याची ओढ दिली की यशाचं मोजमाप होत नाही – नितीन डेहा
संघर्षाला जगण्याची ओढ दिली की यशाचं मोजमाप होत नाही – नितीन डेहा
अमरावती । विनोद जवरे ।
शहीद शहीद सुभेदार एन के खोब्रागडे वाचनालय, अभ्यासिकेच्या ४ था वर्धापनदिन रिद्धपुर येथे साजरा करण्यात आला. यानिमित्त नव्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक हि परीक्षा पास करून पीएसआय झालेले रोशन ओकटे, सौ नयना अमोल साखरकर आणि पोलीस शिपाई पदी नियुक्त मुजिब शेख व रिता गव्हांदे यांचा यावेळी सत्कार सोहळा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी करिअर व्हिजन अकेडमीचे संचालक नितीन डेहा, धिरज थोरात, आकाश जावरकर व जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ ढोमणे सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.
सर्वप्रथम अमरावती जिल्ह्यातील उपस्थित सर्व लोकांना या दोन्ही पोलीस उपनिरीक्षकांनी मार्गदर्शन केले आणि शिक्षणाचे महत्व, वाचनालयाची व अभ्यासिकेची गरज आणि आता युवकांसमोर असलेली आव्हाने, अभ्यासाची गरज या सर्वांचे महत्व यावेळी त्यांनी पटवून दिले. भाषेचा अथवा अपयशाचा न्यूनगंड त्यागून फक्त भाषेचा अथवा अपयशाचा न्यूनगंड त्यागून फक्त सकारात्मतेने अभ्यास करून निश्चितच यश प्राप्त होते अशी विविधांगी उदाहरणाच्या माध्यमातून पटवून दिले. यानंतर सर्वानी भावूक करणारा असा भव्य सत्कार सोहळा येथे पार पडला. यात एन के खोब्रागडे वाचनालय व अभ्यासिका केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी या सर्वांचे स्वागत केले. तसेच एन के खोब्रागडे वाचनालय व अभ्यासिका केंद्र हे सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल वाचनालय समितीचे अभिनंदन व कृतज्ञता व्यक्त केली. पुढे दत्ताभाऊ ढोमणे यांनी वाचनालयास लागणाऱ्या कोणत्याही साहित्याची उपलब्धता त्यांच्यातर्फे करण्यात येईल असे आश्वासन देऊन विद्यार्थाना कृतांत केले.यावेळी दत्ताभाऊ ढोमणे, पोलीस पाटील प्रकाश पोहोकार, प्रवीण जावरकर, पवन हरणे, नाना बिडकर, तात्या मेश्राम, शिल्पा वंजारी, मनिष शेंडे उपस्थित होते. सूत्रसंचालन आकाश गजभिये, प्रास्ताविक हेमंत तागडे व आभार विक्रम मोहोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नोंदविला.