ब्रेकिंग

शिर्डी मध्ये कागदी चहाच्या कपावर बंदी घालावी – डॉ अशोक गावित्रे

शिर्डी मध्ये कागदी चहाच्या कपावर बंदी घालावी – डॉ अशोक गावित्रे

शिर्डी मध्ये कागदी चहाच्या कपावर बंदी घालावी – डॉ अशोक गावित्रे

शिर्डी । प्रतिनिधी ।

चहासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कप बनवताना त्यात बी पी ए नावाच केमिकल वापरले जाते तसेच कपामध्ये हायड्रोफोबिन फिल्मचा थर आतून दिला जातो व गरम चहासोबत तो त्यात विरघळून पोटात गेल्यास कॅन्सर चा धोका उद्भवतो ,एका चहाच्या कपासोबत पंचवीस हजार मायक्रोम प्लास्टिक पोटात जाते हे सामान्य जनतेला जीवितास हानिकारक आहे तरी यावर बंदी घालावी अशी मागणी डॉ अशोक गावित्रे यांनी शिर्डी नगरपरीषदे चे मुख्याधिकारी व साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनातुन केली असून नगरपरिषद हद्दीतील सर्व चहा टपरीधारकांची एक बैठक आयोजित करावी व त्यात हा निर्णय घ्यावा ,तसेच नियमांच उल्लंघन केल्यास दंड म्हणून पहिल्या वेळेस ५००,दुसऱ्यादा१००,तिसऱ्यादा १५०० त्यानंतर केल्यास त्यांचा व्यवसाय परवाना रद्द करावा ,तसेच यासंदर्भात ठिकठिकाणी फलक लावावेत व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व कागदी कपा वर त्वरित बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे,पर्यावरण विभागाचे यावर अगोदरच बंदी घातली असुन अनेक जिल्हात यावर बंदी घालण्यात येत असून शिर्डी मध्ये रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या चहाच्या कपावर बंदी घालावी तसेच यामुळे कपामुळे होणारा कचरा कमी होऊन पर्यावरणाच देखील रक्षण होईलअशी मागणी त्यांनी केली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!