चंदनापुरीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; गाव विकासाच्या अनेक मुद्यावर चर्चा

चंदनापुरीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; गाव विकासाच्या अनेक मुद्यावर चर्चा
चंदनापुरीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; गाव विकासाच्या अनेक मुद्यावर चर्चा
संगमनेर । प्रतिनिधी ।
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी चंदनापुरी गावचे आदर्श सरपंच व समाज भूषण पुरस्कार प्राप्त सरपंच भाऊराव रहाणे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
या प्रसंगी सरपंच भाऊराव रहाणे यांनी उपस्थित महिलांना स्वच्छतेचे महत्त्व सांगत विविध उदाहरणे देऊन पटवून दिले, सांडपाण्याची व्यवस्थापन ग्रामपंचायतीने भूमिगत गटार करून दिलेले आहे त्या गटारांमध्ये सांडपाणी सोडण्याची विनंती केली. रस्त्यावर धुनी , भांड्याचे पाणी सोडून रोगराईस आपण स्वतःहून आमंत्रण देऊ नये व्यवस्थित असे सांडपाण्याची नियोजन करावे अशी उपस्थित महिलांना विनंती केली.आपलं घर, अंगण, गल्ली, आणि गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी निव्वळ ग्रामपंचायत ची नसून तर ती आपली सर्वांची नैतिकतेने जबाबदारी आहे हे पटवून दिले ग्रामपंचायत मार्फत कचरा व्यवस्थापनासाठी दिवसाआड घंटागाडी फिरत आहे घरात आणि परिसरात निर्माण होणारा कचरा संकलन करण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे आज चंदनापुरी गावठाणातील प्रत्येक कुटुंबाला एक या पद्धतीने कचरा बदलीचे वाटप करण्यात आले आणि डशबिनचा सर्वांनी कचरा संकलनासाठी वापर करावा अशी विनंती त्यांनी केली.
त्याचबरोबर उपस्थित महिलांना वर्षात होणाऱ्या चार ग्रामसभा असतात आणि या ग्रामसभांना महिलांनी आवर्जून उपस्थित राहत जावे असे आवाहन देखील सरपंच भाऊराव राहणे यांनी केले. तसेच २६ जानेवारी २०२५ पासून आपण चंदनापुरी गावामध्ये स्वच्छ अंगण स्पर्धा आयोजित करत आहोत या स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन उत्तेजनार्थ बक्षीस मिळण्यासाठी प्रयत्न करावा अशी देखील विनंती यावेळी करण्यात आली.
यावेळी ग्रामविकास अधिकारी रामदास काळे, उपसरपंच हौसाबाई कढणे, सदस्य विद्याताई राहणे, सीमाताई भालेराव, लक्ष्मीबाई राहणे, सुरेखाताई काळे, मंगलताई वाकचौरे, माजी सरपंच तथा सदस्य शंकर भाऊ राहणे, माजी सरपंच तथा सदस्य राजाभाऊ भालेराव, अंकुश राहणे, किरण राहणे, एस .एम राहणे सर, कर्मचारी वृंद,तसेच गावातील ग्रामस्थ मंडळी आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

तर चंदनापुरी ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण परिसरामधून कौतुक होत आहे.