चंदनापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा

चंदनापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा
चंदनापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा
संगमनेर । प्रतिनिधी ।
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ग्रामपंचायती मध्ये रविवार दि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी गावचेआदर्श सरपंच समाज भूषण पुरस्कार प्राप्त सरपंच भाऊराव रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी सेवानिवृत्त मेजर प्रकाश वाकचौरे यांच्या हस्ते ध्वज स्तंभाचे पूजन करत सेवानिवृत्त सुभेदार ज्ञानदेव रामकृष्ण रहाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण. करण्यात आले. यावेळी प्रथम राष्ट्रगीत, राज्य गीत, आणि ध्वजगीत, सामूहिक गायन करण्यात आले.
चंदनापुरी आणि आनंदवाडी गावातील सर्व माजी सैनिक तसेच दिवंगत माजी सैनिकांच्या वीर पत्नी, सध्या सेवेत असणारे पोलीस आणि तलाठी रत्नप्रभा गागरे यांचा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंडळाच्या हस्ते शाल, गुलाब पुष्प बुके, आणि चंदनापुरी गावचे सुपुत्र सागर रघुनाथ भालेराव लिखित संविधानातील गाईड हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला

यावेळी चंदनापुरी, आनंदवाडी गावातील चंदनेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक वृंद,विविध संस्थेचे पदाधिकारी, महिला भगिनी, युवक वर्ग, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.आदर्श सरपंच भाऊराव रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनापुरी गावात प्रथमच प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.