ब्रेकिंग

माझं खरं सोनं आलं, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीनंतर ज्येष्ठांची प्रतिक्रिया

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पठार भागात दौरा

जाहिरात

माझं खरं सोनं आलं, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीनंतर ज्येष्ठांची प्रतिक्रिया
माझं खरं सोनं आलं, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीनंतर ज्येष्ठांची प्रतिक्रिया
माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पठार भागात दौरा
संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन सातत्याने मोठा निधी मिळून गावागावात विकास कामे करून तालुक्याचा कायापालट करणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पठार भागातील विविध गावांना भेटी दिल्या असून या भेटीदरम्यान नागरिकांना गहिवरून आले याच वेळी तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, व कार्यकर्ते यांनी एकजुटीने यापुढे तालुक्याच्या विकासाच्या वाटचालीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निश्चय केला तर ज्येष्ठ नागरिक राधा बाबा शिंदे यांच्या भेटीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत माझं खरं सोनं आलं म्हणून त्यांना गहिवरून आले.

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पठार भागातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला.मोधळवाडी, पिंपळगाव देपा, रणखांब,कुंभारवाडी, दरेवाडी या विविध गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधला.तर मनोली येथील नागरिकांच्या संवादा नंतर जेष्ठ कार्यकर्ते राधा बाबा शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन माजीमंत्री थोरात यांनी त्यांची आस्तेवाईकपणे चौकशी केली. माजी मंत्री थोरात यांना पाहताच राधा बाबा शिंदे हे वयाच्या 95 वर्षात असलेले उठून उभे राहिले. आणि माझं खरं सोनं आलं म्हणून त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत. आपले मन मोकळे केले.

यावेळी जेष्ठ नागरिक म्हणाले की साहेब तालुका तुमच्या पाठीशी आहे. लई जत्रा येतात आणि जातात. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे चिरंजीव तुम्ही आहात. लढाई करायची आहे. तालुक्यात मोठा पश्चाताप झाला आहे. हा घात झाला असून या घातामुळे तालुका पाच वर्षे मागे गेला आहे. अहो संगमनेर चे नाव दिल्लीत तुम्ही नेले. घात झाला. आणि त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी माजी मंत्री यांनी त्यांना धीर दिला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले हा प्रसंग पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले.

जाहिरात

तर पठार भागात नागरिकांशी संवाद साधताना माजी मंत्री थोरात म्हणाले की, सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका उभा राहिला आहे. गावा गावात आपण विकासाची कामे केली आहे. कधीही भेदभाव केला नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेतले आणि म्हणून संगमनेर तालुका वैभवशाली म्हणून ओळखला जातो. येथील सहकार,शिक्षण,बाजारपेठ, अर्थव्यवस्था मजबूत आहे. हे आपल्या सर्वांना टिकवायची आहे. काही लोक मनभेद करण्याचा प्रयत्न करतील परंतु आपण प्रत्येकाने आपला तालुका हा कुटुंब म्हणून या तालुक्याच्या विकासासाठी कायम प्रत्येकाने प्रामाणिक व कटिबद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी विविध गावातील नागरिकांनी आपली मनोगते व्यक्त केली.


संगमनेरच्या निकालाचे कोडे अजून राज्याला उलगडेना – काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी

मागील 40 वर्ष माजीमंत्री बाळासाहेब थोरात हे राज्याच्या विधानसभेत जनतेच्या पाठिंब्याने भरघोस मताने निवडून जात होते. 2014 व 2019 मध्ये मोठ्या लाटा आल्या. मात्र संगमनेरच्या जनतेने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवला. अनेक वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केले. एक स्वच्छ व प्रामाणिक नेतृत्व म्हणून राज्याच्या इतिहासात त्यांचे नाव आहे. सातत्याने तालुक्यातील गावागावात संपर्क असणारा, प्रत्येक कुटुंबाशी जवळीक असणाऱ्या या नेतृत्वाचा झालेला पराभव हा अनपेक्षित असून या निकालाचे कोडे अजूनही राज्याला उलगडले नाही अशी भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी अहमदनगर येथे व्यक्त केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!