के. जे. सोमैया महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाकडून बँक व्हिजिटचे आयोजन

के. जे. सोमैया महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाकडून बँक व्हिजिटचे आयोजन
के. जे. सोमैया महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाकडून बँक व्हिजिटचे आयोजन
कोपरगांव । प्रतिनिधी ।
स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयातील पदव्युत्तर अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी ‘बँक व्हिजिटचे’ आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या कोपरगाव शाखेला भेट दिली. ही भेट मॉडर्न बँकिंग या विषयाचे प्रात्यक्षिक दाखविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. या भेटीदरम्यान बँकेतील अधिकारी मा. विशाल आव्हाड( RM GOVT Business) यांनी बँकेत प्रत्यक्ष व्यवहार कसे चालतात व कोणकोणत्या प्रकारचे व्यवहार चालतात तसेच अकाउंटचे विविध प्रकार, चेकचे प्रकार त्याचबरोबर चेक ओळखण्याचे तंत्र याबाबत सविस्तर माहिती दिली. ऑनलाइन पैसे पाठवण्याचे प्रकार (NEFT, RTGS, IMPS) व त्यातील सुरक्षितता आणि सुरक्षिततेनुसार पैसे पाठवण्याची ठरवून देण्यात आलेली मर्यादा याबाबत देखील मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डेबिट कार्ड आणि त्याचे प्रकार (Visa, MasterCard, Rupay) व त्याचे चार्जेस वेगवेगळे असण्याची कारणे याचीही विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.
मा. विशाल आव्हाड यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया बँकिंग क्षेत्रावर रेगुलेशन कशा प्रकारे ठेवते, याची देखील माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याबरोबरच एटीएम मधून रक्कम काढणे व कॅश डिपॉझिट मशीनच्या माध्यमातून बँकेत अकाउंट मध्ये रक्कम भरणे याचेही प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले.

या बँक व्हिजिटमध्ये विभागाच्या एकूण 31 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून बँकेत प्रत्यक्ष व्यवहार कसे चालतात याचे प्रशिक्षण घेतले. मा. यासीन शेख (CH )यांनी बँक विजिट साठी परवानगी देऊन सहकार्य केले. विक्रांत दरेकर (BM)सागर रोडे( Deputy Manager) यांनी हे सहकार्य केले.या बँक व्हिजिटसाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेखा भिंगारदिवे व विभागातील डॉ. महारुद्र खोसे, रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे व प्रा. दिनेश घुगे यांनी विशेष परिश्रम घेतले. या बँक व्हिजिटच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अशोकराव रोहमारे, सचिव मा. ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. श्री. संदीप रोहमारे, मा. प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी अभिनंदन केले.