ब्रेकिंग

उबाठा शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदाचा बाळासाहेब रहाणे यांनी दिला राजीनामा

कौटुंबिक अडचणीचे दिले कारण

उबाठा शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदाचा बाळासाहेब रहाणे यांनी दिला राजीनामा

कोपरगाव । विनोद जवरे ।

कोपरगाव तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाळासाहेब रहाणे यांनी बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आपल्या उबाठा शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. कौटुंबिक अडचणीचे कारण देत त्यांनी राजीनामेचे पत्रच मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहे.सन 1988 पासून ते ठाकरे शिवसेनेत कार्यरत होते. आठ दिवसापूर्वी उबाठा सेनेच्या जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा नितीनराव औताडे यांनी दिल्यानंतर संघटनेमध्ये महत्त्वाच्या असलेल्या तालुकाप्रमुख पदाचाही राजीनामा रहाणे यांनी दिला असल्याने हे पद रिक्त झाले आहे.गेल्या 35 वर्षापासून पक्षाचे एकनिष्ठ काम केले असल्याने त्यांचा पक्षात दबदबा होता. कोपरगाव तालुक्यातील शिवसेना पक्षाचे ते बहादरपुर चे पहिले सरपंच अविवाहित असताना झाले होते. 1997 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद शिवसेनेच्या तिकटावर अस्तगाव गटातून लढवली होती. तर 2017 मध्ये पंचायत समितीची निवडणूक लढवून ते पोहेगाव गणातून विजयी झाले होते.पक्षामध्ये काम करत असताना त्यांनी निळवंडे कृती समिती तसेच माजी खासदार सूर्यभान वहाडणे यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव देशमुख उपसा जलसिंचन (उजनी चारी) संदर्भात सक्रिय आंदोलनात सहभाग घेतला होता.पक्षवाढीसाठी त्यांनी निष्ठेने काम करत सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले आहे.मात्र कौटुंबिक अडचणीमुळे या पदावर काम करणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी आपला तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा मातोश्रीवर पाठवला आहे.नितीनराव औताडे यांच्या समन्वयक पदाच्या राजीनाम्या नंतर रहाणे यांचा मातोश्रीवर तालुकाप्रमुख पदाचा दुसरा राजीनामा धडकला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!