अमृतवाहिनी मध्ये मेधा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू
अमृतवाहिनी मध्ये मेधा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू
संगमनेर । प्रतिनिधी ।काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मेधा महोत्सवाची जय्यत तयारी अमृतवाहिनी शिक्षण सुरू आहे .२ व ३ फेब्रुवारी रोजी हा महोत्सव होत असल्याची माहिती विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांनी दिली आहे.
माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी संस्थेने गुणवत्तेतून देशपातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. नुकतेच इंजीनियरिंग कॉलेजला ऑटोनॉमस कॉलेज म्हणून मान्यता मिळाली आहे. याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर विविध मानांकनेही मिळाले आहेत.मागील आठ वर्षापासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मेधा महोत्सव होत आहे .यामध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, आयपीएस अधिकारी विश्वास पाटील, कृष्णप्रकाश, सिनेअभिनेता विवेक ओबेराय, सिने अभिनेत्री मानसी नाईक, सोनाली कुलकर्णी, शेखर सुमन ,अध्ययन सुमन, हास्य सम्राट भाऊ कदम, कुशल बद्रिके ,संस्कृती बानगुडे ,श्रेयस तळपदे प्रार्थना बेहेरे या कलाकारांनी सहभाग घेतला आहे

यावर्षी मेधा मैदानावर २ आणि ३ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने जय्यत तयारी सुरू असून मेधा मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे .याचबरोबर पंधरा हजार विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर स्वतंत्र पार्किंग, पालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था ,60 बाय 80 फुटाची भव्य स्टेज, पाच मोठ्या एलईडी स्क्रीन, ऑनलाइन प्रक्षेपण, ढोलीबाजा पथक यांसह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळे ड्रेस कोड देण्यात आले आहे.पेंटिंग, वैयक्तिक नृत्य ,गायन, वादन, पेपर प्रेझेंटेशन याचबरोबर भव्य टेक्निकल प्रदर्शन आयोजित केले आहे .याचीही तयारी पूर्ण झाली आहे रविवारी मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, उद्योजक तथा लेखक शरद तांदळे, सौ. शरयू ताई देशमुख, राजवर्धन थोरात ,डॉ जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मेधा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहेया मेधा महोत्सवाची जय्यत तयारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,मुख्य समन्वय प्राचार्य डॉ एम ए व्यंकटेश,सांस्कृतिक समन्वयक डॉ.विलास शिंदे यांसह सर्व प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू