माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र
प्रस्तावित आश्वी अप्पर तहसील कार्यालयाचा चुकीच्या प्रस्तावाबाबत तीव्र नाराजी
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र
प्रस्तावित आश्वी अप्पर तहसील कार्यालयाचा चुकीच्या प्रस्तावाबाबत तीव्र नाराजी

याचसोबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना या चुकीच्या प्रस्तावा बाबत पत्र लिहिले आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी संगमनेर यांनी शासनाकडे पाठवलेल्या प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा आहे. तो वस्तुस्थितीला धरून नाही. या प्रस्तावामुळे जनतेची सोय होण्यापेक्षा गैरसोय अधिक होणार आहे. असे दिसते संगमनेर शहरालगाच्या गावांना देखील या प्रस्तावानुसार आश्वी बुद्रुक या प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालया जोडले आहे. भौगोलिक परिस्थिती, महसुली मंडळाची सोय अशा कोणत्याच बाबींचा या प्रस्ताव तयार करताना विचार केलेला नाही.महत्त्वाचे म्हणजे यातील अनेक गावांना प्रास्तावित आश्वी येथील कार्यालयात जाण्यासाठी संगमनेर वरूनच जावे लागते आहे. ही बाब अत्यंत गंभीर व प्रशासनाच्या बेजबाबदारपणाची आहे.या प्रस्तावामुळे तालुक्याच्या एकता आणि अखंडतेला धक्का लागला आहे. तरी मुख्यमंत्री महोदय व महसूल मंत्री महोदय यांनी आपल्या स्तरावरून या गंभीर बाबीची दखल घेऊन महसूल विभागाने काढलेला हा चुकीचा प्रस्ताव रद्द करून तातडीने फेरविचार करण्यासंबंधी कळवावे. महसूल प्रशासनातील ताण कमी करत असताना जनतेची गैरसोय होणार नाही. याची दक्षता घ्यावी. तसेच संगमनेर तालुक्याची एकता, अखंडता आणि सांस्कृतिक परंपरेला तसेच भौगोलिक रचनेला धक्का लागणार नाही. याबाबत ही तातडीने नवा प्रस्ताव करण्याच्या सूचना द्याव्या अशी मागणी मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे .या पत्रानंतर मुख्यमंत्री कार्यालय व महसूलमंत्री कार्यालय यांच्याकडून याबाबत सकारात्मक विचार होईल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगण्यात आले आहे.