संगमनेर तालुक्याला उन्हासह जाणवताय नेतृत्वाचे चटके

नवीन लोकप्रतिनिधीकडून कोणतेच काम होत नाही, नागरिकांची संतप्त भावना
संगमनेर । प्रतिनिधी । मागील अनेक वर्ष संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात सावलीत होता. कोणतेही प्रश्न निर्माण झाले की नागरिक हक्काने त्यांच्याकडून ते सोडून घ्यायचे. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर तातडीने उपलब्ध व्हायचे. मात्र सध्या राज्यासह तालुक्यात प्रचंड उष्णता वाढली असून तालुक्यात काही गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत असून आता संगमनेर तालुक्यातील जनतेला उन्हासह नेतृत्वाची चटके जाणू लागले आहेत. पर्जन्य छायेचा प्रदेश असलेला आणि अत्यंत कमी पाऊस असलेला संगमनेर तालुका लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून राज्यात अग्रगण्य बनवला. याचबरोबर निळवंडे धरण डावा आणि उजवा कालवा पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिले. शहरात मोठमोठ्या विकास कामांसह थेट पाईपलाईन योजनेमुळे नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत आहे. शांतता सुव्यवस्था आणि आर्थिक समृद्धी असलेल्या संगमनेर तालुक्याला मात्र मागील दीड वर्षापासून नेतृत्वाचे चटके बसू लागले आहे.

उन्हाळ्यामध्ये नागरिकांची पाण्यासाठी पठार भागांमध्ये वन वन सुरू आहे 18 गावांमधून 34 वाड्यांमधील नागरिकांना 13 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे मात्र अनेक टँकर पोहोचत नाही. अत्यंत अपुरा टँकर मिळतो यामुळे चौधरवाडी, कुंभारवाडी, वरवंडी,खंडेरायवाडी,साकुर, पिंपळगाव देपा, माळेगाव पठार, दरेवाडी,पोखरी बाळेश्वर, खरशिंदे, नान्नज दुमाला,पारेगाव खुर्द, कवठे मलकापूर व काकडवाडी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत. पठार भागातील काही गावांमधील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केल्यानंतर कोणतेही राजकारण न करता जनता आपली आहे या हेतूने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने राजहंस दूध संघाचे टँकर उपलब्ध करून दिले आहेत. याउलट नवीन लोकप्रतिनिधीने काही ठिकाणी स्वतःच्या नावाच्या फाउंडेशनचे टँकर पाठवले फोटो सेशन झाले आणि टँकर गायब झाले. जलजीवनच्या कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण झाले आहेत. रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. टक्केवारीची कुजबूज सर्वत्र सुरू आहे.तालुक्यामध्ये शांतता सुव्यवस्था बिघडली आहे. अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जे कामे होत आहेत ते सर्व 2024 पूर्वी मंजूर झालेली आहेत. नव्याने कोणतेही काम होत नाही. याउलट संकट कोणतेही असो संगमनेर तालुक्याला त्यामधून जास्तीत जास्त मदत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम मिळवून दिली आहे. मात्र नुकतेच राज्यातून जिल्ह्याला सर्वाधिक पिक विमा मिळूनही संगमनेर तालुक्याला मात्र जाणीवपूर्वक वंचित ठेवले गेले. तालुक्याला शून्य टक्के पिक विमा मिळाला त्यानंतर नवीन लोकप्रतिनिधीने हे अपयश अधिकाऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला. बाह्यशक्तींपुढे तालुक्याच्या नेतृत्वाचे काही चालत नसल्याची टीका असल्याचे युवक काँग्रेसचे सरचिटणीस सोमनाथ गडाख यांनी केली आहे. फक्त बातम्या देणे, फोटो सेशन करणे, सोशल मीडियावर उलट सुलट खोटी माहिती पसरवणे असा उद्योग सुरू असून प्रत्यक्षात कोणतेही विकास काम होत नसल्याने पठार भाग व तळेगाव परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

पाण्याच्या मागणी करता आम्ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा करताना त्यांनी आम्हाला शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली आहे. या उलट नवीन लोकप्रतिनिधीने फक्त फोटो सेशन केले. जनतेला आता त्यांची चूक कळली असून उन्हाळ्याबरोबर नेतृत्वाची चटके जाणू लागले असल्याचे काकडवाडीचे सरपंच जनार्दन कासार व सुनील कासार यांनी म्हटले आहे.