वडगाव पान विद्यालयात 1000 विद्यार्थ्यांच्या साखळीने योग प्रतिकृती
डी.के.मोरे जनता विद्यालय विद्यार्थ्यांच्या साखळी प्रतिकृतीतून विविध संदेश
वडगाव पान विद्यालयात 1000 विद्यार्थ्यांच्या साखळीने योग प्रतिकृती


डी.के.मोरे जनता विद्यालय विद्यार्थ्यांच्या साखळी प्रतिकृतीतून विविध संदेश

डी के मोरे जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वडगाव पान येथे योग दिनाच्या निमित्ताने 1000 विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी प्राचार्य पोपट दये, क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर कलाशिक्षक सत्यानंद कसाब उपमुख्याध्यापक प्रताप आहेर, प्रा. संध्या निकम, विकास पवार भारत सोनवणे प्रकाशने हे रवींद्र काशीद गोरख कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.डी के मोरे जनता विद्यालयात विविध दिनाच्या निमित्ताने क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर व कला शिक्षक सत्यानंद कसाब हे सर्व विद्यार्थ्यांची मानवी साखळी बनवून दरवर्षी विविध संदेश देणारी प्रतिकृती तयार करतात. या दोन्ही शिक्षकांच्या उपक्रमशीलतेबद्दल तालुका भरातून सातत्याने त्यांचे अभिनंदन होत आहे. जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत असलेल्या योग दिनाच्या निमित्ताने सांधेदुखी स्नायूंची कमजोरी संतुलन बिघडणे आणि मानसिक तणाव यासारख्या समस्यांमधून मुक्तता मिळण्यासाठी योग गरजेचा असून नियमित योगाभ्यास करावा याकरता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 1000 विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून योगाची प्रात्यक्षिके सादर केली.यावेळी बोलताना बाळासाहेब कांडेकर म्हणाले की विविध दिनाच्या निमित्ताने कलाशिक्षक सत्यानंद कसाब व आपण विद्यालयाच्या भव्य मैदानावर प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी आखून त्यावर विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करतो त्यातून उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना त्या दिनाचे महत्त्व पटावे. यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य मिळत असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा मोठा आनंद देणारा असतो. या योग दिनाच्या बनवलेल्या मानवी साखळी बद्दल काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉ सुधीर तांबे,आमदार सत्यजित तांबे,सौ.दुर्गाताई तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ, प्रा..बाबा खरात, प्राचार्य पोपट दये यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे



