लोकनेते थोरात यांच्या नेतृत्वामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल – विलास कवडे
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरी येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

लोकनेते थोरात यांच्या नेतृत्वामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल – विलास कवडे

लोकनेते थोरात यांच्या नेतृत्वामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल – विलास कवडे
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुरी येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कवडे परिवाराकडून साहेबराव कवडे यांनी नांदुरी दुमाला येथील माध्यमिक प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे छायाचित्र असलेल्या 1515 फुलस्केप वह्यांचे वाटप केले.यावेळी बोलताना विलास कवडे म्हणाले की, दुष्काळी संगमनेर तालुका ते राज्यातील विकसित संगमनेर तालुका हा बदल लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी घडून आणला आहे. पाईपलाईनचे जाळे निर्माण करण्याबरोबर संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्था यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. याचबरोबर तालुक्यात शिक्षण व्यवस्था अत्यंत चांगली असून संगमनेर शहर हे आरोग्य सुविधेचे केंद्र ठरले आहे. दररोज नऊ लाख लिटरपेक्षा जास्त दूध उत्पादन करणाऱ्या तालुक्यात दहा लाख पेक्षा जास्त अंडी उत्पादन होत आहे. आर्थिक समृद्धी बरोबर शिक्षणात ही मोठी प्रगती झाल्याने नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला आहे.

निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी देणाऱ्या लोकनेत्यांनी जनसामान्यांच्या विकासाकरता सातत्याने काम केले आहे. नांदुरी दुमाला मधील अनेक विकास विकास कामांसाठी त्यांनी मोठा निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले तर भाऊसाहेब एरंडे म्हणाले की, शैक्षणिक, सहकार, कृषी याबरोबर संगमनेर तालुक्याची आर्थिक बाजारपेठ समृद्ध झाली आहे ती लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे एमआयडीसी मधूनही 100 पेक्षा जास्त उद्योग सुरू असून यामुळे सुमारे पाच हजार लोकांना रोजगार मिळाले असल्याचे ते म्हणाले. तर डी.एम लांडगे म्हणाले की, माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेततळ्याची योजना आणली आणि डाळिंब उत्पादनामध्ये संगमनेर तालुका हा डाळिंबाचे आगर बनला.यावेळी प्राचार्य वामन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर साहेबराव कवडे यांनी आभार मानले यावेळी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.