ब्रेकिंग

पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाहणी

पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाहणी

जामखेड । प्रतिनिधी । तालुक्यातील अरणगाव येथे पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतीपिकांची पाहणी करण्यासाठी जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पावसाअभावी झालेल्या नुकसानीचे स्वरूप आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीपिकांवर निर्माण झालेल्या संकटाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. शासनाच्या मदतीपासून नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे आणि आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!