ब्रेकिंग

अभ्यास करणे हे भाग्याचे लक्षण आहे –  ॲड.डॉ.उज्वलकुमार चव्हाण

जाहिरात
अभ्यास करणे हे भाग्याचे लक्षण आहे –  ॲड.डॉ.उज्वलकुमार चव्हाण

अभ्यास करणे हे भाग्याचे लक्षण आहे –  ॲड.डॉ.उज्वलकुमार चव्हाण

संगमनेर ( प्रतिनिधी ) निरंतर परिश्रम हे त्या व्यक्तिला त्याच्या यशस्वीतेकडे मार्गस्थ करत असते. यशाच्या प्रवासात अनेक अपयशचा सामना करावा लागतो. ज्यांना यश प्राप्ती झाली त्यांनी काय प्रयत्न केले त्यातून योग्य बोध घेऊन आपला यशाचा मार्ग सुखकर करावा. त्याचप्रमाणे युवकांनी बेरोजगार, भ्रष्टाचार, अज्ञान, अंधश्रद्धा, आलस,नकारात्मकता सोशल मीडिया आदिना बळी न पडता त्यातून योग्य मार्गावर मार्गस्थ व्हावे. तारुण्यातील विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे, व्यायाम करणे.तन आणि मन निरोगी ठेवणे,सकारात्मक विचार हिच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

वार्षिक स्नेह संमेलन निमित्त पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मा.नगराध्याक्षा सौ.दुर्गाताई तांबे संस्थेचे सह सचीव दत्तात्रय चासकर,संचालक सिताराम वर्पे, राजिस्ट्रार बी.आर.गंवादे, डॉ.नामदेव गुंजाळ, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ.बाळासाहेब वाघ, उपप्राचार्य, डॉ.विलास कोल्हे,नॅक समन्वयक डॉ.लक्ष्मण घायवट, परीक्षा अधिकारी डॉ.मिलिंद सकळकळे,प्रशासकिय अधिकारी गोरक्षनाथ पानसरे आदि मान्यवार उपस्थित होते. अॅड.डॉ.उज्वलकुमार चव्हाण म्हणाले कि, चरथं भिक्खव्वे चारिकं,बहुजन हिताय बहुजन सुखाय’ गौतम बुध्दांनी त्यांच्या शिष्याना जनतेच्या कल्याण आणि सुखासाठी संदेश दिला. त्याच मार्गवार मार्गस्थ होऊन संगमनेर सारख्या ग्रामीण क्षेत्रात सहयाद्री संस्थाची ची मुहर्तमेढ रोवली तीचे आज वट वृक्षात रुपांतर झाले आहेत. सह्याद्री विद्यालय हे ग्रामीण भागातील आज १३ हजार विद्यार्थ्यांना शिक्षित करुन त्यांचे हित साकार करण्याचे यशस्वी कार्य आहोरात्र करत आहे. असे मत अॅड डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांनी व्यक्त केले.

यावेळी डॉ.सुधीर तांबे यांनी पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांनी ते म्हटले कि, पारितोषिक वितरण समारंभाचे उद्देश्य म्हणजे चांगल्या वर्तनाला प्रोत्साहन देणे. विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक भावना जागृत करुन भविष्यांच्या वाटचालीसाठी सशक्त नागरिक बनविणे. स्पर्धात्मक युगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रामाणिकपणे सतत प्रयत्नशील असणे,विज्ञान युगातील नवीनता आत्मसात करुन त्याचा लाभ स्वतःच्या उज्जवल भवितव्यासाठी करणे इ.उद्देश्य समोर ठेवून महाविद्यालय सतत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करत असते. असे मत त्यांनी व्यक्त केले.एस.एम.बी.एस.थोरात महाविद्यालयात २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वार्षिक क्रिडा स्पर्धा,रंगोळी स्पर्धा,मेंहदी स्पर्धा,पाककला.ड्रेपरी डे,आनंद मेळावा,टाय डे,टेªडिशनल डे,विविध गुणदर्शन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.यामध्ये क्रिडा संचालक प्रो.डॉ प्रमोद खैरे,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.जयराम डेरे, एन.सी.सी प्रमुख प्रा.राजेंद्र जोरवर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.राजेंद्र मंजुळ,कला मंडळप्रमुख प्रा.नानासाहेब गुंजाळ यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुखशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीचे तसेच महाविद्यालयातील स्वयंसेवक यांचे देखील विशेष सहकार्य लाभले.  
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!