ब्रेकिंग
तुम्ही जितके जास्त शिकाल तितके यशस्वी व्हाल! – अरविंद गाडेकर

तुम्ही जितके जास्त शिकाल तितके यशस्वी व्हाल! – अरविंद गाडेकर

तुम्ही जितके जास्त शिकाल तितके यशस्वी व्हाल! – अरविंद गाडेकर
संगमनेर । विनोद जवरे ।
न्यू इंग्लिश स्कूल सातेवाडी, ता. अकोले या शाळेत इयत्ता 10 वीच्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ आणि पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते अरविंद गाडेकर म्हणाले, ” शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे वाक्य कृतीतून सिद्ध केले. पदव्या, किताबांनी मोठेपणा मिळत नाही, जीवनात आपण जो अनुभव घेतो आणि जे शिकतो तेच आपल्याला महान बनवते. मोबाईल असो वा पुस्तकं त्यातून तुम्ही काय घेता, कसे व किती घेता हे महत्वाचे आहे. किती आंतर कापले, आपण किती गोष्टींबद्दल वाचले, बोललो, त्या बोलण्यातून आपण काय शिकलो आणि आपण आयुष्यात काय प्रगती केली हे महत्वाचे आहे, म्हणूनच तुम्ही जितके शिकाल तितके बघाल.

नेहमी सकारात्मक रहा, नैराश्य आले तर पालकांशी मनमोकळेपणाने बोला.” व्यंगचित्र दाखवीत अरविंद गाडेकर यांनी हसविले आणि हसवता हसवता मार्मिक चिमटे काढीत व्यंगचित्रातून प्रेरणादायी व्याख्यान दिले. यावेळी या मुख्याध्यापक पंडित देशमुख यांनी अरविंद गाडेकर यांचा सत्कार केला.शाळेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सातेवाडी गावाचे सरपंच केशवराव बुळे हे होते. सर्व कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समिती व इतर समित्यांचे सदस्य उपस्थित होते.अनेक स्पर्धामधील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार मान्यवारांच्या हस्ते करण्यात आला. 10वीच्या विदयार्थ्यांनी निरोपाचे मनोगत व्यक्त केले आणि मनोगत व्यक्त करताना ते भावूक झाले आणि ते स्वतःचे अश्रू आवरू शकले नाही.
यावेळी शाळेचे कृतिशील शिक्षक काळे, घाटकर, नवले, भारंबे मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी सुमंत गिते, भूषण कानवडे, राजु गिते, सुरेश चौधरी आणि सातेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हे उपस्थित होते.