ब्रेकिंग

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या भौतिकोपचार महाविद्यालयास “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२५” चा राष्ट्रीय पुरस्कार

जाहिरात
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या भौतिकोपचार महाविद्यालयास “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२५” चा राष्ट्रीय पुरस्कार

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या भौतिकोपचार महाविद्यालयास “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२५” चा राष्ट्रीय पुरस्कार

अहिल्यानगर । प्रतिनिधी ।

फिजिओथेरपी अर्थात भौतिकोपचार तज्ञ यांची सर्वोच्च राष्ट्रीय संस्था असलेल्या इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी (आयएपी) तर्फे दिनांक १५ व १६ फेब्रुवारी २०२५ रोजी नाशिक येथे दोन दिवसीय फिजिओथेरपिस्ट तज्ञांच्या ६२ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या भौतिकोपचार महाविद्यालयास “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२५” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच “सर्वोत्कृष्ट प्राचार्य” म्हणून डॉ. श्याम गणवीर यांना सन्मानित करण्यात आले.

सदर पुरस्कार आयएपीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. अली इराणी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. संजीव झा, खजिनदार डॉ. रुची वार्ष्णेय, आ. सत्यजीत तांबे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे संचालक (वैद्यकीय) प्रा. डॉ. अभिजीत दिवटे व प्राचार्य डॉ. श्याम गणवीर यांनी स्वीकारला.डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे भौतिकोपचार महाविद्यालय हे सन २००७ पासून सुरू असून राष्ट्रीय मूल्यांकन एवं प्रत्यापन परिषद (NAAC) द्वारे ‘A Grade’ मानांकित आहे. तसेच तज्ञ शिक्षकवृंद यांचेमार्फत प्रतिभावान, कार्यक्षम आणि अष्टपैलू भौतिकोपचारतज्ञ घडविण्याचे अविरत कार्य सदरील महाविद्यालय करीत आहे. या महाविद्यालयामध्ये ६० क्षमतेने पदवी (UG) व ०५ विषयांत पदव्युत्तर (PG) तसेच २४ विद्यार्थी विद्यावाचस्पती (Ph.D.) अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत.

भारतात भौतिकोपचार तज्ञांची संख्या खूप कमी आहे, त्यामुळे त्यांची संख्या वाढविणे गरजेचे असून अनेक व्याधींमुळे रूग्णांना हालचाल करणे व खेळाडूंसाठी देखील फिजिओथेरपीचे योगदान महत्वपूर्ण ठरत आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी करण्यात आले.१९५५ साली स्थापन झालेल्या इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी या संस्थेच्या सदस्यांनी समाजाला व देशाला सशक्त व सुदृढ ठेवण्यासाठी केलेले कार्य गौरवास्पद असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.सदरील पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुजय विखे पाटील तसेच महासंचालक (प्रशासन) डॉ. पी. एम. गायकवाड यांनी भौतिकोपचार महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!