ब्रेकिंग
जवळके के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १००% निकालाची परंपरा कायम.
जवळके के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १००% निकालाची परंपरा कायम.

कोपरगांव । विनोद जवरे ।
पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी 2023 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच Online जाहीर झाला असून जवळके येथील के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून. विज्ञान शाखेतून सार्थक गोरख घारे (87.33%) हा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला तसेच सायली मिनानाथ म्हाळसकर (85.83%) ही विद्यार्थिनी द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली व ऋतुजा भाऊपाटील थोरात (75.33) ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. वाणिज्य विभागातून रोजमीन रमजान सय्यद (82%) ही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून निकिता भाऊसाहेब शिंदे (81.50%) द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली व नेहा भाऊसाहेब शिंदे (81.17%) ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे,सुजित दादा रोहमारे, संदीपराव रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव तसेच जवळके महाविद्यालयाचे प्राचार्य डी.आर.सोनवणे आदींनी अभिनंदन केले.