ब्रेकिंग

जनतेच्या सुविधे करीता कार्यालय निर्माण करणे हे शासनाचे काम आहे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जाहिरात
जनतेच्या सुविधे करीता कार्यालय निर्माण करणे हे शासनाचे काम आहे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जनतेच्या सुविधे करीता कार्यालय निर्माण करणे हे शासनाचे काम आहे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
ज्यांच्याकडे कोणतेच मुद्दे राहीलेले नाहीत ते फक्त जनतेला पुढे करून अस्तित्वाची लढाई करून दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत.

लोणी । प्रतिनिधी । अप्पर तहसिल कार्यालयाच्या संदर्भात शासन स्तरावरून जिल्हाधिकर्याना सूचना देण्यात आल्या असून,महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचे स्पष्टीकरण जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.ज्यांच्याकडे मुद्दे राहीले नाहीत,ते आता जनतेला पुढे करून लढाई करीत असल्याचा टोलाही त्यांनी माध्यमांशी बोलतांना लगावला.शिवजयंती सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,अप्पर तहसिल कार्यालयाला स्थगिती मिळाल्याची बातमी ही अहील्यानगर जिल्ह्याची नसून सोलापूर जिल्ह्यातील अनगर या गावाची असल्याचा खुलासा केला.संगमनेर तालुक्यातील अप्पर तहसिल कार्यालयाच्या संदर्भात भूमिका मांडताना विखे पाटील म्हणाले की,जनतेच्या सुविधे करीता कार्यालय निर्माण करणे हे शासनाचे काम आहे.आश्वी बरोबरच घारगाव, साकूर येथे अप्पर तहसिल कार्यालय व्हावे आशी मागणी पुढे आली असल्याकडे लक्ष वेधून याबाबत ग्रामस्थांच्या असलेल्या भावनांचा कुठेही अनादर न करता महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.महसूली मंडळाच्या फेररचनेसाठी जिल्हाधिकर्याना सूचना देण्यात आल्या असल्याचे विखे पाटील म्हणाले.

जाहिरात

अप्पर तहसिल कार्यालयावरून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,ज्यांच्याकडे कोणतेच मुद्दे राहीलेले नाहीत ते फक्त जनतेला पुढे करून अस्तित्वाची लढाई करून दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. ज्यांनी वर्षानुवर्ष मक्तेदारी आणि दहशत निर्माण केली त्यांना जनतेन झुगारून दिले आहे.परभव पचवता येत नसल्यामुळेच अप्पर तहसिल कार्यालयाच्या विषयावर राजकारण केले जात असल्याची त्यांनी केली.अतिक्रमण काढण्याच्या विषयावर प्रतिक्रीया व्यक्त करताना पालक मंत्री म्हणाले की, वाढत्या नागरीकरणामुळे हा प्रश्न जटील झाला आहे.राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अंतराचे निकष ठरलेले आहेत.अतिक्रमण काढून लोकांना विस्थापित करण हा उद्देश नाही.आजही अनेक ठिकाणचा मोबदला देण बाकी असल्याने यासाठी राज्यव्यापी धोरण घेण्याबबात आपण पाठपुरावा करणार आहोत.शिर्डीतील गुन्हेगारीच समूळ उच्चाटन करण्याच काम सुरू असून, जादा दराने पूजेच साहीत्य विकणे हा सुध्दा गंभीर विषय आहे.फुल विकण्याचा अधिकार मंदीर परीसरात फक्त संस्थान सोसायटीला देण्यात आला आहे.अनाधिकृत विक्री होत असेल तर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शिर्डीचे नाव बदनाम होवू नये म्हणून प्रत्येक दुकानाच्या बाहेर दरपत्रक लावण्यासाठी व लूटमार करणार्या विरोधात कारवाई करण्याच्या पालिका प्रशासनास आपण दिल्या असल्याचे विखे यांनी सांगितले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेनी छत्रपतीचा विचार घेवून शिवसेनेची स्थापना केली.त्यांच्या विचारानेच शिवसेनेची वाटचाल होती.पण सतेसाठी विचारांशी फारकत घेण्याच काम उध्दव ठाकरे आणि त्याच्या सहकार्यानी केले. हिंदुत्वाशी फारकत घेणारे खरे फितूर आहेत.आशा गद्दारांना निवडणुकीत जनतेन धडा शिकवला असल्याची टिका मंत्री विखे पाटील यांनी केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!