ब्रेकिंग

महाराष्ट्रधर्म हा समतेचा विचार देणारा- डॉ जयश्रीताई थोरात

जय शिवाजी महाराज , जय भवानी , जय शिवाजी अशा घोषणांनी  संगमनेर दुमदुमले

जाहिरात
महाराष्ट्रधर्म हा समतेचा विचार देणारा- डॉ जयश्रीताई थोरात

महाराष्ट्रधर्म हा समतेचा विचार देणारा- डॉ जयश्रीताई थोरात

जय शिवाजी महाराज , जय भवानी , जय शिवाजी अशा घोषणांनी  संगमनेर दुमदुमले
संगमनेर । प्रतिनिधी । अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने एकविरा फाउंडेशन व छत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने संगमनेर मध्ये भव्य मोटरसायकल रॅली संपन्न झाली असून यामध्ये 1000 युवकांनी सहभाग घेतला. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म हा समतेचा विचार देणार असल्याचे प्रतिपादन डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.

एकविरा फाउंडेशन व छत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने संगमनेर मध्ये भव्य पूर्ण सायकल रॅली संपन्न झाली. यावेळी छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन आहेर, यांच्यासह संगमनेर मधील छत्रपती प्रतिष्ठान विविध शिवप्रेमी मंडळे व एकवीरा फाउंडेशन चे युवक व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे सुदर्शन निवासस्थान शिवाजीनगर संगमनेर बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे अभिवादन करून ही मोटरसायकल रॅली ढोल ताशांच्या व पारंपारिक वाद्यांच्या गजरांमध्ये मालपाणी लॉन्सकडे आली. या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, महाराष्ट्रात हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज ,डॉ बाबासाहेब आंबेडकर ,अहिल्याबाई होळकर आणि संतांच्या विचाराचा आहे. मानवता हा धर्म त्यांनी दिला असून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म हा समतेचा विचार देणार आहे. आणि तो आपल्या सर्वांना जपला पाहिजे.
महाराजांनी सर्वधर्मसमभाव शिकवला, लोकशाही शिकवली स्त्रियांचा सन्मान करणे शिकवले, न्यायदान शिकवले. हे सर्व तरुणांनी जीवनामध्ये वापरले पाहिजे. महाराज अजून दहा वर्ष असते तर संपूर्ण जगामध्ये स्वराज्य निर्माण झाले असते .असे सांगताना सध्या राजकारणासाठी काही लोक चुकीचा वापर करत आहे. महाराष्ट्रधर्म मोडू पाहत आहेत .महाराष्ट्रामध्ये युपी, बिहार पॅटर्न राबवला जात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे.महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण कमी पडलो आहोत .संगमनेर तालुका हा विचारांचा बालेकिल्ला आहे. पुन्हा एकदा हा किल्ला आपण जिंकणार आहोत .सगळ्यांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करणं समाजाच्या कल्याणासाठी काम करत राहणं हा शिवविचार घेऊन आपण सर्वजण यापुढील काळात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काम करून असे त्या म्हणाल्या.यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे, विश्वासराव मुर्तडक, शिवव्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.ढोल ताशांच्या गजरात झालेल्या या कार्यक्रमात तरुणांनी मोठा सहभाग घेतला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!