काँग्रेसच्या जिल्हा डॉक्टर सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाचे महत्त्वपूर्ण योगदान - आमदार थोरात
देशाच्या विकासात काँग्रेस पक्षाचे महत्त्वपूर्ण योगदान – आमदार थोरात
संगमनेर । विनोद जवरे ।
काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचणारा पक्ष आहे.या पक्षाने देशाच्या हिताकरता अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आहे. त्यागाची व बलिदानाची परंपरा असलेल्या या पक्षाने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून जिल्हा काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आले आहेत.महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर सेल सदस्य निवडी प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेलचे डॉ. मनोज राका, राजेंद्र पाटील नागवडे ,ज्ञानदेव वाफारे,डॉ. दादासाहेब थोरात, दादा घुले, सुरेश झावरे ,मिलिंद कानवडे ,डॉ.तुषार दिघे, बाळासाहेब आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नाशिक जिल्हा डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी नीलम पाटणी, संगमनेर तालुका अध्यक्षपदी डॉ.सचिन वाळे, राहुरी तालुका अध्यक्षपदी डॉ. सचिन चौधरी, अकोले तालुका अध्यक्षपदी डॉ. अरुण बोबले, कोपरगाव तालुका अध्यक्षपदी डॉ.सुजित तांबे, नेवासा तालुका अध्यक्षपदी डॉ. सोपान कर्डिले, पाथर्डी तालुका अध्यक्षपदी डॉ.जमशेद शेख, पारनेर तालुका अध्यक्षपदी डॉ.गुलाब शेख तर श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी डॉक्टर सचिन जाधव यांची निवड झाली असून जिल्हा सेक्रेटरी पदी जयसिंग कानवडे व तय्यब शेख यांची निवड झाली आहे. यावेळी आमदार थोरात म्हणाले की, सर्वसामान्यांच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष हा कायम कटिबद्ध असून काँग्रेस पक्षाने तळागाळातील जनतेसाठी महत्त्वाचे काम केले आहे. डॉक्टर सेलच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम तालुका अध्यक्षांनी केले पाहिजे. काँग्रेस पक्षाला ताकद देऊन पुन्हा सत्तेवर आणायचे आहे असेही यावेळी आमदार थोरात म्हणाले. यावेळी राजेंद्र नागवडे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने कायम सर्व धर्म समभाव मानून सर्वांना सोबत घेऊन विकास प्रक्रियेत वाटचाल केली आहे. निवड झालेल्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षाचे काम करून काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला पाहिजे या देशांमध्ये धर्माच्या नावावर आलेले भाजप पुन्हा सत्तेवर येण्याकरता धर्माच्या नावाखाली वाद निर्माण करण्याची काम करत आहे अशा जातीयवादी पक्षाला खाली खेचण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. यावेळी मिलिंद कानवडे, ज्ञानदेव वाफारे ,दादासाहेब थोरात, डॉ. राका यांचीही मनोगते झाली.