ब्रेकिंग
सत्तेचा गैर उपयोग कोण करतं हे जनतेला माहीती आहे – शिवसेना जिल्हा उपप्रमुख रहाणे
सरपंचांनी ग्रामसेवकाची बाजू घेतल्याने मिरची लागली
सत्तेचा गैर उपयोग कोण करतं हे जनतेला माहीती आहे – शिवसेना जिल्हा उपप्रमुख रहाणे

सत्तेचा गैर उपयोग कोण करतं हे जनतेला माहीती आहे – शिवसेना जिल्हा उपप्रमुख रहाणे
सरपंचांनी ग्रामसेवकाची बाजू घेतल्याने मिरची लागली
कोपरगाव । प्रतिनिधी ।
पोहेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास जनता दरबारात जाणून बुजून अपमानित केल्याबद्दल प्रामाणिक ग्रामसेवकाच्या बाजूने सरपंच अलका जाधव यांनी आ आशुतोष काळे यांना खडेबोल सुनावले होते. तसेच तालुक्यातील वस्तुस्थिती मांडत विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 3000 कोटींच्या विकासाची वल्गना यामुळे हवेत विरली. याचाच राग मनात ठेवून आपल्या कारखान्यातील संचालकाच्या नावाने नितीनराव औताडे यांच्यावर टीका करणे ही आमदार आशुतोष काळे यांची जुनीच परंपरा व पद्धत आहे. दलित वस्तीचा निधी कोण अडवते सतेचा दुरुपयोग कोण करतं हे जनतेला चांगलेच माहित झालेले आहे.नितीनराव औताडे हे विकासात्मक कामातून पुढे आलेले नेतृत्व आहे. आपल्या साऱके आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे नाहीत.सरपंचांनी ग्रामसेवकाची बाजू घेतल्याने बहुतेक आ काळे यांना मिरची लागली असावी अशी टिका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे यांनी केली.

प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी म्हटले आहे की जिल्हयामध्ये पोहेगाव ग्रामपंचायतीला विकासाचे मॉडेल बनवणारे औताडे यांचे काम देखील जनतेला माहित आहे. जिल्हा मध्ये पोहेगाव ग्रामपंचायतीला विकासाचे मॉडेल बनवणारे औताडे यांचे काम देखील जनतेला माहित आहे. विधानसभेला महायुती असल्याने मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची लोकप्रियतता व लाडक्या बहिणीमुळे आमदार महोदयांची निवडणूक एकतर्फी झाली. अन्यथा आपली लायकी दिसून आली असती. ग्रामपंचायतीमध्ये कोणाचीचीही आडवणुक होत नाही. कागदपत्रांची पूर्तता करून मागणी अर्जाप्रमाणे दाखले दिले जातात.

कदाचित आपल्याला श्री मयुरेश्वर देवस्थानची स्थापना करताना नितीनराव औताडे सरपंच असताना दिलेल्या दाखल्यावरच ट्रस्टची स्थापना झालेली आहे हे . कदाचित आपल्याला माहीत नसावे हे दुर्दैवं आहे. श्री मयुरेश्वर गणपती मंदिराच्या आड विनाकारण धार्मिक मुद्द्याचं राजकारण करू नये. जनता दरबारात तक्रार करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे व्यवसाय माहित असून देखील केवळ राजकारणा पोटी अवैद्य धंद्यांना खतपाणी घालून सामाजिक समतोल बिघडण्याचे काम करू नये. सरपंच अलका जाधव यांनी मांडलेल्या मुद्द्याचा खुलासा करण्याऐवजी कुणाच्यातरी नावाने बातम्या देऊन आपला खरा चेहरा लपणार नाही. लाखो रुपये निवडणुकीत खर्च करून देखील पोहेगावची जनता औताडे यांच्या बाजूनेच कौल का देते. ग्रामपंचायतीची सत्ता आपल्या ताब्यात का येत नाही याची खंत अजूनही आ. काळे यांना जाणवत असल्याचेही बाळासाहेब रहाणे यांनी म्हटले आहे.