
ॲड.आर.बी.सोनवणे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

ॲड.आर.बी.सोनवणे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
संगमनेर । प्रतिनिधी । महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांचे कट्टर समर्थक तथा अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड.रामनाथ सोनवणे उर्फ आर सोनवणे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.निमगाव भोजापूर येथील रहिवासी असलेले ॲड.आर.बी.सोनवणे यांनी संगमनेरच्या सहकार आणि राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले याचबरोबर आपल्या गुणवत्तेतून देशात आक्रमणांकित असलेल्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त पद सांभाळले. संगमनेर मधील प्रथित यश कायदे तज्ञ म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. अगदी अल्पशा आजाराने त्यांचे वयाच्या 82 वर्षी निधन झाले असून त्यांच्या पश्चात दोन मुले मुली असा मोठा परिवार आहे.

ॲड.आर.बी.सोनवणे यांनी वकिली बरोबर संगमनेरच्या शैक्षणिक सामाजिक आणि सहकार क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे याचबरोबर गाव पातळीवर विविध सहकारी संस्थांमध्येही त्यांनी नेतृत्व दिले. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ सहकारी हरपला असल्याची भावना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर कायद्याचे व शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू मार्गदर्शक हरपले असल्याचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.ॲड.आर.बी.सोनवणे यांच्या निधनाबद्दल मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे ,डॉ.जयश्रीताई थोरात, ॲड. माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे,पांडुरंग पा. घुले, रणजीत सिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे रामहरी कातोरे, सुनील कडलग, विलास वरपे, आनंद वर्पे, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्हि.बी.धुमाळ तसेच सर्व प्राचार्य विभाग प्रमुख यांनी दुःख व्यक्त केले आहे याचबरोबर अमृत उद्योग समूह,निमगाव भोजापुर ,चिकणी परिसरातील नागरिकांनीही दुःख व्यक्त केले आहे.



