ब्रेकिंग

आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

जाहिरात मो-7756045359
आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांचा वाढदिवस कोपरगाव मतदारसंघात विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रम राबवून साध्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. नेहमीच्या राजकीय जल्लोषाला बाजूला ठेवून जनसेवेचे व्रत अंगीकारत कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

तहसील कार्यालय कोपरगाव व अंजनापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने नागरिकांसाठी एका विशेष महसूल व रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी रेशनकार्डशी मोबाईल क्रमांक जोडणे, रेशन कार्ड विभक्त करणे, अन्न सुरक्षा योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करणे तसेच रेशन कार्ड जोडणी अशा विविध गरजू सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.जेऊर कुंभारीत आमदार आशुतोष काळे मित्र मंडळाच्या वतीने गंगेश्वर महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी डाऊच बु. गावचे राष्ट्रवादी काळे गटाचे सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते आणि जेऊर कुंभारी येथे कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना आणि सलग्न संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित्त होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!