ब्रेकिंग
पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस उत्साहात साजरा
पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस उत्साहात साजरा

कोपरगांव । विनोद जवरे ।
दिनांक १२ मे हा दिवस सर्वत्र आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचेच औचित्य साधून पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा तर्फे येथील मुख्यालय व त्या अंतर्गत येणारी उपकेंद्रे येथे काम करणाऱ्या सर्व परिचारिकांन साठी आज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन बडदे यांच्या सूचनेनुसार तसेच इतर सर्व कर्मचारी व सी एच ओ यांच्या उत्स्फूर्त सहभागाने एक कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व उपस्थित परिचारिकांचा पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला. आरोग्य सहाय्यक श्री नंदाराम वाघ यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. आरोग्य अधिकारी डॉक्टर श्री नितीन बडदे यांच्यासह सी एच ओ श्रीमती तोडकर मॕडम,फार्मसिस्ट श्रीमती गजर मॕडम , आरोग्य सेवक श्री बाळासो जाधव यांनी उपस्थित सर्व परीचारीकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपापले अनुभव सर्वांसमोर व्यक्त केले. तसेच एल एच व्ही श्रीमती भांड सिस्टर यांनी परिचारिका दिवसाचे महत्व सर्वांना समजावून सांगितले तसेच हा दिवस साजरा करण्यामागची कारणे ही विस्तृत रीत्या स्पष्ट केली आरोग्य सेविका श्रीमती जाधव सिस्टर यांनी परिचारीका म्हणून काम करताना आलेला एक विशिष्ट अनुभव सर्वांना सांगितला .शेवटी सर्व उपस्थित परिचारिकांच्या हस्ते केक कापून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अचानक हा कतज्ञता सोहळा आयोजीत करण्यात आल्याने सर्व परिचारिकांनी आनंद व्यक्त केला व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन बडदे व उपस्थित सर्वांचे आभार मानले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहील खोत सि एच ओ श्री आयुब शेख ,श्रीमती नागरे मॅडम आरोग्य सहाय्यक श्री दिवाने आरोग्य सेवक श्री ओहोळ श्री दुधाटकर गटप्रवर्तक श्रीमती औताडे श्रीमती गव्हाणे आरोग्यसेविका श्रीमती गायकवाड श्रीमती पवार श्रीमती शहाणे तसेच पि एच सी कर्मचारी श्री गोसावी उपस्थित होते