ब्रेकिंग

विजेचा खेळखंडोबा सुरू असताना लोकप्रतिनिधीची जनतेच्या विरोधी भूमिका – अरुण गुंजाळ

विजेचा खेळखंडोबा सुरू असताना लोकप्रतिनिधीची जनतेच्या विरोधी भूमिका – अरुण गुंजाळ
संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून आणि कामातून संगमनेर तालुका उभा राहिला आहे. निळवंडे धरण व कालवे त्यांनीच पूर्ण केले. निवडणुकीत ईव्हीएम मॅनेज करून त्यांचा घात करण्यात आला. मात्र अवघ्या तीनच महिन्यात जनतेला तालुक्यातील त्यांच्या नेतृत्व नसल्याचे चटके जाणू लागले असून नवीन लोकप्रतिनिधी हे विजेचा खेळ खंडोबा, पाणी प्रश्न यावर जनतेचे बाजूने हवे आहे. मात्र ते पूर्वेकडील नेत्यांच्या इशाऱ्यावर तालुक्याच्या विरोधी भूमिका घेत असल्याची घाणाघाटी टीका कृती समितीचे उपाध्यक्ष अरुण गुंजाळ यांनी केली आहे.

जाहिरात

अप्पर तहसील कार्यालय विरोधी कृती समितीचे उपाध्यक्ष अरुण गुंजाळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्याचे लोकप्रतिनिधी यांनी कायम पूर्वेकडील नेत्यांची हत्यार म्हणून काम केले आहे. तालुक्याची घडी मोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना येथील जनतेचे कोणतेही घेणे देणे नाही. त्यांना तालुक्याचा विकास माहिती नाही किंवा आत्तापर्यंत त्यांनी एक सुद्धा सामाजिक काम केले नाही.उन्हाळा लागला आहे याचबरोबर उन्हाची चटके बसू लागले आहे. आता तालुक्यातील जनतेला लोकनेते थोरात यांचे नेतृत्व नसल्याचे चटकेही बसू लागले आहे. चाळीस वर्षात हा तालुका विकसित म्हणून पुढे नेला मात्र तालुक्याला मागे लोटण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. नदीला पाणी सुरू असताना तालुक्यातील विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे. तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहे. पिण्याच्या पाण्याचे सर्वत्र हाल सुरू आहे. संगमनेर शहरामध्ये लाईटचा लपंडाव सुरू आहे. बाजारपेठ मंदावली आहे. अस्थिरता वाढीस लागली आहे. हे सर्व सुरू असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र फक्त पत्रक बाजी करत आहे.
ज्यांना अद्याप तालुका ही माहिती नाही ते आता बातम्यांमधून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे. आपण केलेले एक तरी काम दाखवा मग बोला असा थेट सवाल करताना संगमनेर तालुक्याची मोडतोड सुरू असताना आपण गप्प का. कुणाच्या इशाऱ्यावर मोडतोड सुरू आहे. आणि तुमचा कामाचा आवाका तरी किती आहे असा सवाल त्यांनी केला आहे.निळवंडेचे पाणी हे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कष्टातून आले. धरण आणि कालवे पूर्ण होते. परंतु विश्वासघाताने महायुतीचे सरकार आले आणि फक्त पाणी सोडण्याचे काम त्यांनी केले. यामध्ये त्यांचे कोणते ही योगदान नाही हे पूर्ण नगर जिल्हा आणि महाराष्ट्राला माहिती आहे.

जाहिरात

त्यांच्या कृपाशीर्वादाने तुम्ही संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी झाला आहात म्हणून तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांचा उल्लेख करता तुमचे योगदान काय असा थेट सवाल अरुण गुंजाळ यांनी केला असून तहसीलदार प्रस्ताव दाखल करतो मंत्रालयापर्यंत तो जातो आणि येथील लोकप्रतिनिधींना तो माहीत सुद्धा नसतो हा काय अजब गोंधळ आहे. याबाबत आपण उत्तर द्या याचबरोबर तालुक्यामध्ये लाईटचा गोंधळ निर्माण झाला आहे. पिण्याचे पाण्याच्या समस्या आहेत या सुटल्या नाहीत तर मोठा जन उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!