ब्रेकिंग
भारत महोत्सवात अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजला चॅम्पियनशिप

भारत महोत्सवात अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजला चॅम्पियनशिप

भारत महोत्सवात अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजला चॅम्पियनशिप
संगमनेर । प्रतिनिधी । अखिल भारतीय कल्चरल ऑर्गनायझेशन भारत महोत्सव 2025 या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दिनांक 16 मे ते 22 मे या दरम्यान पुणे येथे करण्यात आले होते. या महोत्सवात अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व जुनियर कॉलेजमधील 82 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्याचे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड,पुणे.या ठिकाणी 22 मे 2025 रोजी समारंभ संपन्न झाला.

त्यातील विविध स्पर्धांत संगमनेर येथील अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील एकूण 82 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धेत 17 बक्षीसांसह भारत महोत्सव 2025 ची चॅम्पियनशिप मिळवली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत 2000 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रशांत त्रिभुवन लिखित व दिग्दर्शित मूकनाट्य( सांघिक द्वितीय, तृतीय) समूह लोकगीत( सांघिक द्वितीय , तृतीय) गायन(सांघिक द्वितीय ,तृतीय) एकांकिका( सांघिक द्वितीय , तृतीय) एकपात्री अभिनय( प्रथम: अन्वी फटांगरे; प्रथम: वैष्णवी पारधी), एकल नृत्य( प्रथम: संबोधी आहेर) समूह नृत्य (द्वितीय, तृतीय) एकल वादन भारतीय( प्रथम: क्षितिज मुसळे) एकल वादन पाश्चिमात्य( प्रथम: देवांश दारोळे) एकल गायन( प्रथम: श्राव्या सहाने; तृतीय: स्वरा बोरकर) या विविध कलाप्रकारात 17 पारितोषिके मिळवून राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवून आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे द्वार खुले केले.या पारितोषिक वितरण समारंभास नृत्यदिग्दर्शक श्री वैभव घुगे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले व मार्गदर्शन केले. या समारंभास भारत देशातील विविध राज्यांतील स्पर्धक ,स्पर्धेला लाभलेले परीक्षक, ऑर्गनायझेशन चे सदस्य उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या सांस्कृतिक महोत्सवात सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक प्रशांत त्रिभुवन व सांस्कृतिक समितीच्या सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही.बी.धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे.