ब्रेकिंग

साकूर रुग्णालयात आमदार सत्यजित तांबेंची पाहणी

डॉक्टरांच्या सेवेची प्रशंसा, निधीसाठी पाठपुरावा करणार

साकूर रुग्णालयात आमदार सत्यजित तांबेंची पाहणी

साकूर रुग्णालयात आमदार सत्यजित तांबेंची पाहणी
डॉक्टरांच्या सेवेची प्रशंसा, निधीसाठी पाठपुरावा करणार
संगमनेर । प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालय सध्या अडचणींचा सामना करत असले तरी येथील आरोग्यसेवा समाधानकारकपणे सुरू आहे. या रुग्णालयाची स्थापना माझ्या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या कार्यकाळात झाली असून, ही वास्तू माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

दरम्यान, रुग्णालयाच्या दयनीय अवस्थेची माहिती मिळाल्यानंतर गुरूवारी( ता.२२) दुपारी आमदार तांबे यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी  रुग्णालयाची पाहणी करून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅक्टर प्रल्हाद बांबळे व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. अडचणींचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

२०१२ साली जिल्हा परिषद सदस्य असताना या ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. २०१४ मध्ये भूमिपूजन झाले आणि २०१६ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. साकूरमध्येच हे रुग्णालय व्हावे यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाने विशेष प्रयत्न केले आणि आज या परिसरातील नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे,”सध्या या रुग्णालयात दरमहा १० ते १५ प्रसूती होत असून दररोज सुमारे १२५ रुग्णांची तपासणी केली जाते. सध्या देखील १० ते १५ रुग्ण येथे अ‍ॅडमिट आहेत. यावरून येथील सेवा किती उपयोगी पडते हे स्पष्ट होते.रुग्णालयाची ही वास्तू चांगल्या प्रकारे सुरू आहे, मात्र काही अडचणी अजूनही आहेत. त्या अडचणी मी समजून घेतल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत की त्यांनी प्रस्ताव तयार करून आरोग्य विभागाकडे पाठवावा. त्यानंतर मी स्वतः पाठपुरावा करून आवश्यक निधी आणणार आहे, जेणेकरून उर्वरित सुविधाही पूर्ण करता येतील. “येथील डॉक्टरही आग्रही आहेत की या छोट्या – छोट्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. आज सर्वत्र निधीअभावी अडचणी निर्माण होत असल्या तरी साकूर ग्रामीण रुग्णालय हा माझा जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे. त्यामुळे यासाठी मी कटिबद्ध आहे. येत्या काळात निधी उपलब्ध करून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल,” असेही ते म्हणाले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!