पाण्याचे नियोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- ना.विखे पाटील
पाण्याचे नियोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- ना.विखे पाटील
पाण्याचे नियोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- ना.विखे पाटील
शिर्डी । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रात पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर आणि नवनवीन धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे, विक्रम काळे यांनी शेतकऱ्यांच्या कृषींपपापाला जलमापक यंत्रे बसविण्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना अधिक पाणी देण्यासाठी आणि जुनी व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपाय योजना करण्यात येईल. पाणी वाटपाच्या आकारणीसाठी मीटर पद्धती किंवा वॉल्यूमेट्रिक पद्धत अधिक उपयुक्त आहे, यावर विचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.काही भागांमध्ये भौगोलिक स्थितीमुळे पुरानंतर पाण्याचा नाश होतोय, तर काही भागांमध्ये पाणी संघर्ष आहे. त्यामुळे उद्भवलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर जुने ढांचे सुधारण्याचे प्रयत्न सुरू असून यामुळे पाण्याचा अधिक योग्य व्यवस्थापन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जलसंपत्तीच्या प्रशासनात सुधारणा करण्यासाठी नव्या उपाययोजना आणि निर्णय घेण्यात येत असल्याचेही मंत्री विखे पाटील यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.