ब्रेकिंग

लोकार्पण: ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशनने राबवलेला पाणपोईचा उपक्रम कौतुकास्पद

थंड पाण्याने जवळके - धोंडेवाडी नागरिकांची तहान भागणार

लोकार्पण: ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशनने राबवलेला पाणपोईचा उपक्रम कौतुकास्पद

जाहिरात

थंड पाण्याने जवळके – धोंडेवाडी नागरिकांची तहान भागणार

कोपरगांव । प्रतिनिधी । नववर्ष निमित्त जवळके – धोंडेवाडी येथे सामाजिक बांधिलकी जपत पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवासी आणि नागरिकांची तहान भागवण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.


ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशन यांच्या वतीने शनिवार दि. 22 मार्च २०२६ रोजी जवळके – धोंडेवाडी येथील बस थांबा परिसरात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जवळके- धोंडेवाडी येथील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले.उन्हाळ्याच्या दिवसांत जवळके – धोंडेवाडी मार्गावरून दररोज हजारो नागरिक व प्रवासी प्रवास करतात. कडाक्याच्या उन्हामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा पाणपोई उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून सामाजिक कार्याचा एक आदर्शही समोर आला आहे.


या उपक्रमासाठी ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशन ग्रुपचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जलसेवा उपक्रम राबवत असून, समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. पाणपोई उभारणी मध्ये ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,सदस्य, तसेच जवळके- धोंडेवाडी ग्रामस्थांचे विशेष योगदान लाभले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!