एकविराच्यावतीने महिला दिनानिमित्त बिबट्याशी लढणाऱ्या नंदा दुधवडे यांचा गौरव
डॉ. जयश्रीताई थोरात व सौ दुर्गाताई तांबे यांनी केला सत्कार

एकविराच्यावतीने महिला दिनानिमित्त बिबट्याशी लढणाऱ्या नंदा दुधवडे यांचा गौरव

एकविराच्यावतीने महिला दिनानिमित्त बिबट्याशी लढणाऱ्या नंदा दुधवडे यांचा गौरव
डॉ. जयश्रीताई थोरात व सौ दुर्गाताई तांबे यांनी केला सत्कार

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा सुरू आहेत. या कार्यक्रमात आज हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत धाडस दाखवून आपल्या पतीचे प्राण वाचवणाऱ्या चंदनापुरीची वाघीण म्हणून नंदाताई दुधवडे यांचा गौरव करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की मेंढपाळ व्यवसाय करणारे चंदू दुधवडे व नंदाताई यांनी दिवसभर कार वस्ती जवळ आपली मेंढरं चारली. त्यानंतर तेथेच सायंकाळी मेंढरांची जाळी (वाघूर) टाकून तेथे मुक्काम केला यावेळी रात्री बिबट्याने त्या वाघुर मध्ये उडी मारली आणि मेंढ्यांवर हल्ला केला. यामध्ये एक मेंढीचा मृत्यू झाला. मेंढीला सोडवण्यासाठी चंदू दुधावडे यांनी बिबट्याला हुसकण्याचा प्रयत्न केला. यावर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने चंदू यांची मान पकडली. बिबट्याने नवऱ्याला पकडलेले पाहून नंदा हिने बिबट्याचे मागून शेपूट ओढले. तरी बिबट्या आली चंदू यांची झटापट सुरू होती. यानंतर नंदाताई यांनी प्रसंगावधान राखून लाकडाने बिबट्यावर हल्ला केला. यानंतर बिबट्या पळून गेला. प्रत्यक्ष मृतुच्या दाढेतून आपल्या पतीला वाचवणाऱ्या नंदाताईचे एकविरा फाउंडेशनच्या वतीने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात व सौ दुर्गाताई तांबे यांनी कौतुक केले.यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, महिलाही शांत संयमी असते परंतु वेळेला ती किती कणखर होते याचे उत्तम उदाहरण नंदाताई यांनी दाखवले आहे. आपल्या कुटुंबाकरता आणि पतीकरता जीवावर उदार होऊन वाघाशी झुंज दिली आहे. अर्धा तासाच्या झटापटी नंतरही नंदाताई यांनी आपला धीर सोडला नाही .आणि त्यामुळे आज त्यांचे पतीचे प्राण वाचले आहे. वेळेला प्रत्येक महिलांनी असंच कणखर राहून येणाऱ्या संकटाशी लढण्याकरता प्रेरणा घ्यावी असे त्या म्हणाल्या. तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, महिला ह्या विविध क्षेत्रात पुरुषांबरोबरीने काम करत आहे. अगदी धाडसाचे काम ही महिला करतात नंदाने दाखवलेले धाडस हे सावित्री प्रमाणे असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी उपस्थित सर्व महिलांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून चंदू दुधावडे यांची चौकशी तर नंदा दुधाडे यांचे कौतुक
बिबट्याने केलेले हल्ल्याची घटना कळतात लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दुधवडे कुटुंबाला तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार चंदू दूधवडे यांना कुटे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. यानंतर चंदू दुधवडे यांची अस्थिवायकपणे चौकशी करून नंदा ताई दुधवडे यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे चंदनापुरीची वाघीण म्हणून कौतुक केले आहे.