ब्रेकिंग

गौतम पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

गौतम पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

गौतम पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कोपरगांव । प्रतिनिधी ।

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार (दि.८) रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य नूर शेख होते.या प्रसंगी सर्वप्रथम सौ.सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी गौतम पब्लिक स्कूलमध्ये विविध विभागातील एकूण ८० महिला कर्मचारी, पुरुष कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या पुढाकारातून सर्व महिला कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य नूर शेख म्हणाले की, महिलांचे भविष्य उज्ज्वल आणि समृद्ध बनवण्यासाठी संपूर्ण समाजाने पुढे येऊन त्यांना सन्मान देवून त्यांना समान संधी देणे आवश्यक आहे हि संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांची आदर्श विचारसरणी डोळ्यासमोर ठेवून गौतम पब्लिक स्कूलने नेहमीच महिला भगिनींचा आदर सन्मान केला आहे. महिलांनी विविध क्षेत्रात यशाचे उंच शिखर गाठून आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. महिलांचा हक्क, त्यांचे सशक्तीकरण आणि समानतेसाठी सर्व समाज घटकांनी योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी शाळेच्या क्वायर ग्रुप ने महिलांना समर्पित विविध सुमधुर गाणी सादर केली. अशोक होन,रेखा जाधव,कविता चव्हाण,कावेरी वक्ते आदींनी महिला दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक उत्तम सोनवणे यांनी केले तर आभार प्रतिभा बोरनर यांनी मानले.

जाहिरात

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती शेलार, राजेंद्र आढाव,गोरक्षनाथ चव्हाण, अशोक होन, उत्तम सोनवणे, सुनील सूर्यवंशी,सचिन गुंजाळ आदींसह  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!