संगमनेर शहरात महापुरुषांचे पुतळे उभारणार – सत्यजित तांबे
संगमनेर बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा

संगमनेर शहरात महापुरुषांचे पुतळे उभारणार – सत्यजित तांबे
संगमनेर शहरात महापुरुषांचे पुतळे उभारणार – सत्यजित तांबे
संगमनेर बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा
स्वाभिमानी संगमनेर तालुक्यातील जनतेच्या वतीने 17 मार्च रोजी भव्य जयंती साजरी होणार
संगमनेर । प्रतिनिधी । अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार होणारी 17 मार्च 2025 रोजी ची जयंती भव्य दिव्य साजरी होणार असून या निमित्त संगमनेर बस स्थानक परिसरात महाराजांच्या मंदिराचा देखावा उभारण्यात येणार असून सर्वांनी या देखाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.
संगमनेर तालुका शिवजयंती उत्सव समिती व तालुक्यातील सर्व संघटनांच्या वतीने एकत्रित भव्य महाराजांचे मंदिर उभारून शिवजयंती साजरी होणार आहे. याचा प्रारंभ करण्यात आला यावेळी आमदार सत्यजित तांबे, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, खंडू सातपुते, गणेश मादास, किशोर टोकसे, निखिल पापडेजा, रमेश नेहे, गजेंद्र नाकील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

दरवर्षी संगमनेर बस स्थानक परिसरात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य जयंती साजरी होत असते यावर्षी संगमनेर तालुक्यातील तमाम शिवप्रेमींनी एकत्र येऊन महाराजांचे भव्य मंदिर उभारून ही जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे 16 ते 17 मार्च या काळामध्ये या ठिकाणी मंदिर उभे असणार आहे. याचबरोबर भव्य मिरवणूक, आतिषबाजी, 600 खेळ, विद्युत रोषणाई, यांसह मॅरेथॉन आणि विविध स्पर्धांचे आयोजन करून ही जयंती अत्यंत मोठ्या उत्साहाने साजरी होणार आहे.यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्तानचे दैवत आहे. त्यांची जयंती दरवर्षी मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. यावर्षी संगमनेर बस स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठ्या मंदिराचा देखावा उभारण्यात येणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून नगरपालिकेने संगमनेर शहरात अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतला यासाठी आपण पाठपुरावा केला आणि संगमनेर बस स्थानकावर जागा मिळवली
या अश्वारूढ पुतळ्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पुतळा शहरांमध्ये उभारला जाणार आहे या महापुरुषांनी मानव जातीला दिशा देण्याचे काम केले असून त्यांचे जीवन कार्य पुढील पिढीसाठी कायम प्रेरणादायी आहे म्हणून हे तीर्थस्थळ उभारणे गरजेचे आहे याचबरोबर सामनापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची बारव पुनर्बांधणी करून ते ही स्मारक होणार आहे. या भव्य दिव्य होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती मध्ये सर्व तरुणांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या देखाव्याचे काम सुरू करण्यात आले असून या ठिकाणी भव्य रोषणाई करण्यात येणार आहे