संवत्सर येथे शृंगेश्वर मंदिरात ११ ते १४ एप्रिल रोजी श्री गणेश व शृंगऋषी मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

संवत्सर येथे शृंगेश्वर मंदिरात ११ ते १४ एप्रिल रोजी श्री गणेश व शृंगऋषी मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

संवत्सर येथे शृंगेश्वर मंदिरात ११ ते १४ एप्रिल रोजी श्री गणेश व शृंगऋषी मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा
कोपरगांव । प्रतिनिधी ।
संवत्सर येथील गोदावरी काठावरील श्री शृंगेश्वर ऋषींच्या मंदिरात श्री गणेश व श्री शृंगेश्वर ऋषी यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा तसेच मंदिरावर नवीन कलशारोहन सोहळा दि. ११ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख प. पूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्याचा महत्वपूर्ण निर्णय संवत्सर येथे झालेल्या ग्रास्थांच्या बैठकीत घेण्यात आला. चार दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले.श्री शृंगेश्वर मंदिर कळस व नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी सोमवार दि. १० मार्च २०२५ रोजी संवत्सर येथे श्री शनी महाराज मंदिराजवळ गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्वपक्षिय कार्यकर्ते व ग्रामस्थ बैठकीस हजर होते. श्री शृंगेश्वर ऋषींची पूर्वीची मूर्ती भंगल्यामुळे ती मिरवणुकीने गोदावरी नदीमध्ये विसर्जीत करण्यात आली. गेल्या ३८ ते ४० वर्षापूर्वी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज, प. पू. रामदासी महाराज. पण. पू. नारायणगिरीजी महाराज, प. पू. राजधबाबा महानुभाव व तत्कालीन अनेक संत महंतांच्या उपस्थितीत व स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या पुढाकारातून शृंगेश्वर मंदिरात जीर्णोध्दार करण्यात आला होता. त्यावेळी स्थापीत केलेली शृंगेश्वर ऋषींची मूर्ती ४० वर्षानंतर भंग पावली होती. या नवीन मूर्ती सोबतच श्री गणेश मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा करण्याबाबत ग्रामस्थांचे एकमत होऊन बैठकीत त्याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यासाठी कार्यकर्त्यांमधून समित्या नियुक्त करण्यात येऊन सोहळ्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे.

श्री गणेश व श्री शृंगेश्वर ऋषी या दोन्हीही मूर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा दि. ११ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख प. पूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार असून पुरोहीत शैलेश जोशी यांच्यासह इतर ब्राम्हणांकडून या सोहळ्याचे पौराहित्य करण्यात येणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमासाठी दररोज ११ जोडपी पूजा अर्चा करण्यासाठी बसणार आहेत. शेवटच्या दिवशी दि. १४ एप्रिल रोजी प. पूज्य रमेशगिरीज महाराज यांचे प्रवचन होणार असून त्यांतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यासाठी ग्रामस्थांनी स्वेच्छेने वर्गणीच्या रुपाने हातभार लावावा यावर देखील बैठकीत एकमत झाले. यावेळी लगेचच लाखाच्या आसपास रक्कम बैठकीत जमा झाली. सोहळा अतिशय भव्य दिव्य स्वरुपात पार पाडण्यासाठी सर्वांनीच आपापल्या परीने योगदान द्यावे असे आवाहन श्री राजेश परजणे पाटील यांनी मार्गदर्शन करताना केले.बैठकीसाठी उपसरपंच विवेक परजणे, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे, कोपरगांव बाजार समितीचे उप सभापती गोवर्धन परजणे, संचालक खंडू फेपाळे, औद्योगिक वसाहतीचे संचालक सोमनाथ निरगुडे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक दिलीपराव बोरनारे, ॲड. शिरीष लोहकणे, लक्ष्मणराव परजणे, पत्रकार शिवाजीराव गायकवाड, दिलीपराव ढेपले, चंद्रकांत लोखंडे, महेश परजणे, पांडुरंग शिंदे, तुषार बारहाते, अनिल आचारी, ज्ञानेश्वर कासार, निवृत्ती लोखंडे, बाबासाहेब निरगुडे. बाळासाहेव दहे, नामदेवराव पावडे, संभाजीराव भोसले, बापूसाहेब तिरमखे, सुभाष बिडवे, तुषार बिडवे, हवीबभाई तांबोळी, सहाणे टेलर, बाबुराव मैंद, बाबासाहेब संत, बापू गायकवाड, अनिल भाकरे, प्रभाकर आबक यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. लक्ष्मणराव साबळे यांनी आभार व्यक्त केले.