ब्रेकिंग

शेतीत राबणाऱ्या रुक्मिणी महिला घुलेवाडी संघाने पटकावला एकविरा चषक

7350 महिलांच्या सहभागात पाच दिवस एकविराचा क्रीडा महोत्सव मोठ्या आनंदात संपन्न

शेतीत राबणाऱ्या रुक्मिणी महिला घुलेवाडी संघाने पटकावला एकविरा चषक


शेतीत राबणाऱ्या रुक्मिणी महिला घुलेवाडी संघाने पटकावला एकविरा चषक

7350 महिलांच्या सहभागात पाच दिवस एकविराचा क्रीडा महोत्सव मोठ्या आनंदात संपन्न

संगमनेर । प्रतिनिधी । लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील एकविरा फाउंडेशनच्या वतीने डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात महिलांना क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून दिली असून एकविरा फाउंडेशनच्या वतीने झालेल्या महिला क्रिकेट व रस्सीखेच सामन्यांमध्ये तालुक्यातील 7350 महिलांनी सहभागी पाच दिवस या सामन्यांचा आनंद लुटला. तर अंतिम सामन्यात खुल्या गटात शेती मातीत राबणाऱ्या घुलेवाडी येथील रुक्मिणी ग्राम संघाने क्रिकेट मधील पहिले बक्षीस पटकावले. तर सावित्रीच्या लेकी यांनी रस्सीखेच स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवले.


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्या वतीने पाच दिवस महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसंगी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, आयोजक डॉ.जयश्रीताई थोरात, सौ.प्रमिलाताई अभंग,सौ.अर्चना बालोडे, सौ.दिपाली वरपे, राजेंद्र काजळे सौ.मालती डाके, सुभाष सांगळे, सौ.रचना मालपाणी, विक्रम ओहोळ, राहुल गडगे, ॲड.सुहास आहे डॉ.हर्षवर्धन गुंजाळ,रिजवान मंत्री आदी उपस्थित होते.

जाहिरात

याप्रसंगी विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या महिलांचा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सत्कार केला. यामध्ये सायकलपटू प्रणिता सोमन, क्रिकेटपटू श्रेया शिंदे, स्वामिनी, अपंगत्वावर मात करून पठार भागामध्ये बारावीच्या क्लासेस बरोबर शिवण क्लास घेणाऱ्या सुनीता कुरकुटे, उच्चशिक्षित शेती करणारी तरुणी वैष्णवी शिंदे त्याचप्रमाणे अवघ्या अकराव्या वर्षी लाठी काठी व तलवारबाजीचे इतर मुलांना प्रशिक्षण देत गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणारी रोकडेश्वर विद्यालय आंबी दुमाला येथील शौर्या नवनाथ सरोदे हिचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, महिलांचा उत्साह पाहून खूप आनंद वाटतो आहे. महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांबरोबर यश मिळवले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहे. शिक्षिका, बँकिंग, इंजिनिअर,डॉक्टर या व्यतिरिक्त मुलींची विविध क्षेत्रात आता भरारी आहे. क्रीडा स्पर्धेतही अनेक मुली चांगले योगदान देत आहे. सुनीता विल्यम्स अजूनही अंतराळात आहेत.त्या लवकरच पृथ्वीवर येणार आहे. या सर्व महिलांचे प्रतिनिधित्व त्या करत आहेत. महिला कुठेही कमी नाही.त्यांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली.तर त्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात.

महिलांना दररोजच्या कामांमध्ये खूप धावपळ असते.संघर्ष असतो. घरातील कामे,शेतीची कामे सर्व महिला अत्यंत जबाबदाऱ्याने पार पडतात. परंतु वर्षातून हा क्रीडा महोत्सव सर्व महिलांसाठी आनंदाचे पर्व ठरतो. अत्यंत मोठ्या संख्येने महिला यामध्ये सहभागी होतात. आनंद घेतात. आणि या स्पर्धा झाल्यानंतर पुन्हा आपल्या कामांमध्ये रमतात. मात्र पुढच्या स्पर्धेची वाट पाहत राहतात. या स्पर्धा यशस्वी आयोजन झाल्याबद्दल सर्वांचे कौतुक त्यांनी केले.तर डॉ.तांबे म्हणाले की, महिला आज कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही.त्यांच्यासाठी विविध उपक्रम एकविरा फाउंडेशनच्या वतीने राबवले जात असून सर्व महिलांनी यामध्ये सातत्याने सहभागी होऊन आपला विकास साधावा असे आवाहन केले.तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, सर्वांच्या सहकार्याने हा क्रीडा महोत्सव यशस्वी झाला आहे. ग्रामीण आणि शहरांमधील महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होत आहेत. सर्वांचा उत्साह हा अत्यंत कौतुकास्पद राहिला आहे.

महिला क्रिकेट स्पर्धांमध्ये खुल्या गटात घुलेवाडी रुक्मिणी ग्राम संघाने वडगाव वाघिणी संघावर 18 धावांनी मात केली. त्यांना एकविरा चषक व प्रथम क्रमांकाचे 11000 रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तर वडगावच्या वाघिणी संघाला द्वितीय क्रमांकाचे 7000 बक्षीस व चषक देऊन गौरवण्यात आले. तर तृतीय क्रमांक हा संगमनेर येथील कळसुबाई ग्रुपने पटकावला. त्यांना 5000 रुपयांचे बक्षीस व चषक देण्यात आला. महाविद्यालयीन गटामध्ये प्रथम क्रमांक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयाने मिळवला. तर द्वितीय क्रमांक अमृतवाहिनी पॉलिटेक्निक व तृतीय क्रमांक सह्याद्री ज्युनिअर कॉलेजने पटकावला. तर शालेय गटामध्ये प्रथम क्रमांक श्री.श्री.रविशंकर इंग्लिश मीडियम स्कूल यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक सह्याद्री विद्यालय संगमनेर यांनी मिळवला. तर तृतीय क्रमांक अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलने मिळवला. रस्सीखेच स्पर्धेमध्ये शालेय गटामध्ये प्रथम क्रमांक आदर्श विद्यालय वडगाव लांडगा यांनी मिळवला. तर द्वितीय क्रमांक सह्याद्री विद्यालय संगमनेर यांनी मिळवला. तृतीय क्रमांक शुक्लेश्वर विद्यालय सुकेवाडी यांनी मिळवला. महाविद्यालय गटामध्ये प्रथम क्रमांक बीएसटी कॉलेज संगमनेर यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक सह्याद्री जुनियर कॉलेज यांनी मिळवला. तर तृतीय क्रमांक रमेश फिरोदिया कॉलेज साकुर यांनी मिळवला. खुला गटामध्ये प्रथम क्रमांक सावित्रीच्या लेकी या ग्रुपने मिळवला. तर द्वितीय क्रमांक सटू बाबा गट समनापुर यांनी मिळवला. तर तृतीय क्रमांक हिरकणी वडगाव पान या संघाने मिळवला.प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना 11000 रुपयांचे बक्षीस व ट्रॉफी द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना सात हजार रुपये बक्षीस व ट्रॉफी आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पाच हजार रुपये व ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध महिला पदाधिकारी कार्यकर्ते व क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाच दिवस स्टेडियमवर जल्लोष तर पारितोषिक वितरण प्रसंगी संस्मरणीय आतिषबाजी

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 6 मार्च ते 10 मार्च 2025 या काळामध्ये झालेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने पाच दिवस स्टेडियम मध्ये महिलांच्या उपस्थितीसह प्रचंड जल्लोष आणि आनंदाचे वातावरण होते. महिलांची मोठी उपस्थिती,अत्यंत चांगली सुविधा, हिरवे मैदान,ढोल ताशांचा गजर यामुळे दिवसेंदिवस प्रेक्षकांची ही उपस्थिती वाढली. याचबरोबर पारितोषिक वितरण समारंभ वेळी डी जे चा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी आणि विद्युत रोषणाई यामुळे संपूर्ण क्रीडा स्टेडियम आनंदाने दणाणून गेले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!