संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात कर्मचारी व घुलेवाडी येथील तरुण कार्यकर्ते जालिंदर भाऊसाहेब वाकचौरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्यू वेळी त्यांचे वय 47 वर्ष होते.अत्यंत मनमिळाऊ स्वभाव, कामात तत्परता, आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पद्धत यामुळे ते घुलेवाडी सह यशोधन कार्यालयात अत्यंत लोकप्रिय होते. दोन मुली यांचे उच्च शिक्षण करताना त्यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला होता.जाहिरात
अत्यंत गरीब परिस्थितीतून आपले कुटुंब पुढे नेताना काळाने अचानक त्यांच्यावर घाला घातला. अत्यंत अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली, भाऊ, वहिनी पुतणे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, बाबासाहेब ओहोळ, सिताराम राऊत, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,भास्करराव पानसरे यांच्यासह यशोधन कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.