मेजर रामदास बढे यांना वीरमरण प्राप्त होण्याची घटना मनाला वेदनादायी – मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

मेजर रामदास बढे यांना वीरमरण प्राप्त होण्याची घटना मनाला वेदनादायी – मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर । प्रतिनिधी ।
देशाप्रती आपले कर्तव्य बजवाताना मेजर रामदास बढे यांना आलेले वीमरण भारत मातेच्या चरणी समर्पित झाले असून, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही आशा शब्दात जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भावना व्यक्त करून आदरांजली अर्पण केली.आपल्या शोक संदेशात मंत्री विखे पाटील यांनी म्हणले आहे की, देशासाठी कर्तव्य बजावत असताना जवानांना येणारे वीरमरण अत्यंत दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारे असते.देशाचे संरक्षण कवच आज फक्त भारतीय जवानांमुळे अभेद्य असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
जम्मू काश्मिर मधील तंगधर येथे सीमा रेषेवर आपले कर्तव्य बजावत असताना रामदास बढे यांना वीरमरण प्राप्त होण्याची घटना मनाला वेदनादायी असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त करून यासर्व दुखद प्रसंगात सरकार बढे कुटूंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. रामदास बढे यांचे वीरमरण भारत मातेच्या चरणी समर्पित झाले असून,त्यांचे बलिदान व्यर्थ जावू द्यायचे नसेल तर, प्रत्येक नागरीकाने देशाप्रती आपली बांधिलकी कर्तव्य भावना खंबीरपणे बजावणे हीच खरी श्रद्धांजली मेजर रामदास बढे यांना ठरेल आशा शब्दात मंत्री विखे पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान मंत्री विखे पाटील यांनी रामदास बढे यांच्या अंत्यसंस्कारात कोणतीही कसूर राहाणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनास दिल्या.रात्री उशिरा बढे यांचे पार्थिव मुंबई मधील विमानतळावर आणण्यात आले. आ.अमोल खताळ यांनी पुष्पचक्र अर्पण करून तालुक्याच्या वतीन पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहीली.