ब्रेकिंग

पोहेगाव नागरी पतसंस्थेला 2 कोटी 23 लाख 15 हजार रुपये नफा – नितीनराव औताडे

 200 कोटी ठेवींकडे संस्थेची वाटचाल,संस्थेची देवाण घेवाण दहा जिल्ह्यात चालणार

पोहेगाव नागरी पतसंस्थेला 2 कोटी 23 लाख 15 हजार रुपये नफा – नितीनराव औताडे
पोहेगाव नागरी पतसंस्थेला 2 कोटी 23 लाख 15 हजार रुपये नफा – नितीनराव औताडे
 200 कोटी ठेवींकडे संस्थेची वाटचाल,संस्थेची देवाण घेवाण दहा जिल्ह्यात चालणार
कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या व नुकतीच नाशिक व पुणे विभागीय कार्यक्षेत्राची वाढ मिळाल्याने आता दहा जिल्ह्यांत संस्थेची देवाण-घेवाण होणार असल्याने संस्थेच्या भरभराटीचा मार्ग मोकळा झाला आहे.पोहेगाव नागरी पतसंस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात विविध ग्राहकाभिमुख सेवांच्या जोरावर वर्षभरात तब्बल  २ कोटी २३  लाख १५  हजार ६२६ रुपये नफा मिळवला. ग्राहक सेवेस केंद्रस्थानी ठेवून केलेल्या पारदर्शक व्यवहारामुळे ठेवीदारांचा विश्वास संपादन करीत ठेवींमध्ये वाढ  सुरू असल्याने आता संस्थेच्या एकूण ठेवी १७९ कोटी ३२ लाख ७  हजार ५१० इतक्या जमा झाल्या आहे.ठेवींचा २०० कोटीचा टप्पा संस्था लवकरात ओलांडणार असल्याची माहिती पोहेगांव नागरी  पतसंस्थेचे संस्थापक  शिवसेना जिल्हाप्रमुख नितिनराव औताडे यांनी दिली आहे.
जाहिरात
    संस्थेच्या ३१  मार्च २०२५ अखेरच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे यांनी सांगितले की संस्थेची वार्षिक उलाढाल १४०२ कोटी ११  लाख ८१ हजार ९२६ रूपये  इतकी आहे, एकूण कर्ज वाटप ११५  कोटी ४ लाख ३२  हजार१५४ रुपये, भाग भांडवल १ कोटी ४७ लाख ९९ हजार ५३३ रुपये, संस्थेची ९० कोटी ३ लाख ४२  हजार ५६३ रुपये गुंतवणूक आहे तर संस्थेची स्थावर मालमत्ता २ कोटी ९२ लाख ५१ हजार १५५ इतकी आहे.
जाहिरात
संस्थेचा सीडी रेशो चे ६४.१५  टक्के आहे.संस्थेत उपलब्ध असलेल्या कोअर बँकिंग सुविधेमुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात सुलभता व तत्परता निर्माण झालेली आहे .संस्थेचा प्रगतीचा आलेख संस्थेचे संस्थापक नितिनराव औताडे,संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे ,उपाध्यक्ष विलासराव रत्ने व सर्व संचालक मंडळ, मुख्य व्यवस्थापक सुभाष औताडे, पोहेगांव शाखेचे व्यवस्थापक विठ्ठल घारे, शिर्डी शाखेचे व्यवस्थापक सोमनाथ मोजड, कोपरगाव शाखेचे व्यवस्थापक  कोल्हे , वसुली अधिकारी, सभासद,ठेविदार, कर्मचारी व कलेक्शन प्रतिनिधी यांच्या सर्वांच्या सहकार्याने वाढतच चाललेला आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी संस्थेने सुसज्ज अशी कोपरगाव शाखेसाठी इमारत उपलब्ध करून दिली आहे. अत्याधुनिक सेवा ,स्ट्राँग रूम ,वीज बिल भरणा केंद्र ,आरटीजीएस ,एनएफटी सोनेतारण कर्ज अदि सुविधा मुळे व पारदर्शक व्यवहारामुळे ठेवीमध्ये वाढ होत आहे.
संस्थेच्या पोहेगाव, कोपरगाव, शिर्डी परिसरातील शाखांमार्फत व्यवसाय वाढवणे ,बाजारपेठेला हातभार लागावा व बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने संस्थेच्या शाखेमार्फत कर्ज वितरण करण्यात येते संस्थेचे कर्जवाटप व वसुली यापुरतेच कार्य मर्यादित नसून संस्था सामाजिक बांधिलकी जोपासत असताना मोफत सर्वरोग निदान शिबीर, मोतीबिंदू शिबीर व विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याची माहितीही नितीनराव औताडे यांनी दिली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!