
विरभद्र पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड

संगमनेर । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्यात राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या निमज येथील विरभद्र नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली आहे.

माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्थेने कायम सभासद व कर्जदारांचे हित जोपासत आर्थिक दृष्ट्या चांगली प्रगती साधली आहे. आणि आता या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड झाली आहे. यात चेअरमन म्हणून संतोष सुभाष डोंगरे तर तर व्हा. चेअरमनपदी दिलीप विठ्ठल कासार यांची निवड झाली आहे. तर संचालक म्हणून बापूसाहेब शिंदे, मंगेश मतकर, रोहिदास डोंगरे ,नितीन डोंगरे, संतोष गुंजाळ, शरद येवले, मीना अडांगळे, स्वाती डोंगरे, सुनंदा कासार यांची निवड झाली आहे.

ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, निमज वि.का सोसायटीचे चेअरमन तुकाराम गुंजाळ, पतसंस्थेचे माजी चेअरमन गंगाधर डोंगरे, तंटामुक्ती अध्यक्ष विलासराव कासार, ग्रामपंचायत उपसरपंच अरुण गुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चतुरे साहेब यांनी काम पाहिले.यावेळी कैलास कासार ,शंकर डोंगरे, विष्णू मुरलीधर डोंगरे, पाराजी डोंगरे ,शांताराम गुंजाळ, शांताराम डोंगरे, सागर डोंगरे, राजेंद्र बोडके , निमज ग्रामपंचायतचे सर्व विद्यमान सदस्य, वि. का सेवा सोसायटीचे सर्व संचालक, वीरभद्र दूध उत्पादक संस्थेचे सर्व संचालक मंडळ, वीरभद्र शिक्षण प्रसारक संस्थेची सर्व विश्वस्त, गावातील ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

या नूतन संचालक मंडळाचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात मा.आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात , रामहरी कातोरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत