ब्रेकिंग

थोरात कारखान्यास वीज निर्मितीमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

सातत्यपूर्ण कामगिरी बद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

थोरात कारखान्यास वीज निर्मितीमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

थोरात कारखान्यास वीज निर्मितीमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

सातत्यपूर्ण कामगिरी बद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

संगमनेर । प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी कृषी व महसूल मंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशातील सहकारासाठी आदर्श ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी वीज निर्मिती बद्दल सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पुणे,बाणेर येथे नॅशनल को जनरेशन फेडरेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार ज्येष्ठ राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी स्वीकारला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी एन पाटील, प्रतापराव पवार, राजेंद्र नागवडे, विवेक कोल्हे, तर थोरात कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, चीफ इंजिनियर नवनाथ गडाख, चीफ केमिस्ट संजय पाटील, अशोक मुटकुळे, भारत देशमुख, भाऊसाहेब खर्डे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या  मार्गदर्शनाखाली कारखान्याने उभारलेला नवीन 5500 मे टन क्षमता व 30 मेगा वॅट वीज  निर्मितीचा प्रकल्प हा दिशादर्शक ठरला आहे. प्रतिकूल परिस्थिती ही कारखान्याने शेतकरी सभासद व ऊस उत्पादक यांचे हित जपताना कायम उच्चांची भाव दिला आहे. याचबरोबर मागील हंगामात 8 लाख 25 हजार 994 मे टनाचे गाळप केले आहे. तर मागील वर्षी 7 कोटी 89 लाख युनिटची वीज निर्मिती केली आहे. यातून 5 कोटी 28 लाख 93 हजार युनिट ही वीज निर्यात केली आहे. यातून कारखान्याला 38 कोटी 71 लाख रुपये नफा झाला आहे. कारखान्याने केलेल्या या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील कन्सिस्टंट परफॉर्मन्स (सातत्यपूर्ण कामगिरी) बदलता राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. मागील वर्षीही थोरात कारखान्याला या पुरस्काराने दिल्ली येथे गौरविण्यात आले होते.

यावेळी बोलताना खासदार पवार म्हणाले की, सहकार क्षेत्राने महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती दिली आहे. सहकार टिकला पाहिजे तो वाढला पाहिजे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारामध्ये आदर्श तत्व रुजवली आणि याच तत्वावर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार हा राज्यासाठी दिशादर्शक ठरणारा आहे. आगामी काळात साखर उद्योगात अनेक आव्हाने असून ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी साखर कारखान्यांच्या कृषी विभागाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील ,माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पी एन पाटील जयप्रकाश दांडेगावकर यांसह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.तर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ म्हणाले की,थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार या कारखान्याला मिळाले आहे. हे पुरस्कार सांघिक कामाचे यश असल्याचे ते म्हणाले. कारखान्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, ॲड माधवराव कानवडे, रणजीत सिंह देशमुख, सुधाकर जोशी शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, बाजीराव पा. खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात ,डॉ जयश्रीताई थोरात, कारखान्याचे व्हाईस चेअरमन संतोष हासे यांसह सर्व संचालक व विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


उत्कृष्ट कामगिरीबद्दल सलग दुसऱ्या वर्षी सन्मान

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने शेतकरी सभासद नागरिक यांचा कायम विश्वास जपताना प्रतिकूल परिस्थितीतही विक्रमी गाळप करत कायम उच्चांकी भाव दिला आहे. कारखान्याने यावर्षी आठ लाख 25 हजार 994 मे टनाचे गाळत केले असून सरासरी साखर उतारा 11.50 राखला आहे. याचबरोबर 7 कोटी 89 लाख युनिट वीज निर्मिती केली आहे कारखान्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नॅशनल को जनरेशन फेडरेशनच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी थोरात कारखान्याला सातत्यपूर्ण कामगिरी बद्दलचा पुरस्कार मिळाला असल्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!