डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची – नानाभाऊ पटोले
शिर्डी येथिल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचा समारोप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची – नानाभाऊ पटोले
शिर्डी येथिल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचा समारोप
कोपरगांव । विनोद जवरे ।
आमच्या समोर अनेक प्रश्न आहेत. संविधान नष्ट झाले तर आपले अधिकारच राहणार नाही.
पक्षातील मजबूत लोकांनाच तिकिटं दिली जातील, आपल्याला निवडणूक हरण्यासाठी किंव्हा कोणाला सांभाळण्यासाठी लढायची नाही. सरकार आल्यास यापुढे सर्वात आधी संघटनेतील पदाधिकारी यांना सत्तेतील पदे, महामंडळ देण्यात येथील. केंद्र सरकार दमनशाही करत आहे. लोकतंत्रिक आंदोलन करू देत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अधिकारच राहिले नाही. म्हणून भाजप आर एस एस विरुद्ध च्या लढाईत सहभागी व्हा, असे सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
महाराष्ट्र मध्ये जिल्हा परिषदेत 15 हजार शाळा आहेत, त्या भांडवलदारांना देण्याचा घाट रचला आहे.80 हजार शिक्षक कमी आहेत. विध्यार्थी शाळेत नाहीत शाळा बंद आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातून आपण येथे आलेलो आहोत आपण त्याच शाळेतून आलो आहे. त्या शाळा बंद करून भाजपने आपले भविष्य खराब केले जात आहे.
स्वातंत्र्य मिळालं तेंव्हा आपल्या कडे काही नव्हते. मात्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान हातात घेऊन काँग्रेस पक्षाने 60 वर्षात देश उभा केला. सुई, विमान बनवले. अनेक क्षेत्रात आपण पुढे गेलो. आणि याचे श्रेय काँग्रेस ला जाते. भाजपने नोकऱ्यां संपवल्या, खाजगीकरणं आणलं अप्रत्यक्ष पणे संविधान संपवण्याचा प्रयत्न आहे.
जो व्यक्ती शेवटचा घटक होता त्याच्या साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आहे, हाच धागा पकडून काँग्रेस मार्ग क्रमण करत आहे, असे सांगून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सन्मान केला. भाजपने नोकऱ्यांचा जुमला दिला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याच आश्वासन दिलं होतं पण ते पूर्ण केलं नाही. ओबीसीना न्याय दिला नाही. जोवर सामाजिक, आर्थिक सर्व्हे होणार नाही तोवर बहुजन लोकांचं स्थान कळणार नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक धोरण स्वीकारण्याची गरज.
जिएसटी हा आर्थिक निर्णय चुकीचा. देशाची तिजोरी आजही खाली. भाजपने देशावर 1 लाख कोटी रुपयांचे 9 वर्षात कर्ज करून ठेवले. सिलेंडर चे 500 रुपये कमी करण्याची घोषणा केली हा ही निवडणूक जुमला आहे. पेट्रोल डिझेल च्या विक्रीतून जनतेची लूट होतं आहे.विविध उदाहरणं देऊन पटोले यांनी भाजपच्या कारभाराची चिरफाड केली.काँग्रेस नव्हे तर विचारधारा अडचणीत – बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत असतांना गोर गरीब जनतेसाठी अनेक चांगल्या योजना युपीए च्या काळात आल्या. मात्र,2014 पर्यंत सगळं बदललं आणि प्रतिगामी विचारधारा सत्तेत आली. त्यामुळे सर्वसामान्य जीवन संकटात आले. त्यामुळे भाजप सत्तेत आल्यामुळे काँग्रेस नव्हे तर विचारधारा संकटात आली. संतांनी समतेचा विचार मांडला आणि यावर कळस म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत या सर्व विचारधारेला अंतरभूत करून सर्वाना न्याय दिले. भारतीय घटनेत काहीच कमी नाही. प्रास्ताविका ही आपली प्रार्थना आहे अशी महती विधानसभा गटनेते बाळासाहेब थोरात यांनी मांडली. घटनेची पायमल्ली होतं असेल तर रस्त्यावर उतरा. प्रणापेक्षाही ही घटना आपल्याला प्रिय असावी. मार्थिन ल्युतर किंग ने म्हटले हे माझे स्वप्न होते, यावरून भारतीय राज्य घटनेचे महत्व कळते.काँग्रेस पक्षाने रायपूर अधिवेशनात ठराव झाल्यानुसार महाराष्ट्रात 50% पदे हे अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व अल्पसंख्यांक समुदायातील कार्यकर्त्यांना द्यावेत अशी अपेक्षा प्रभारी व काँग्रेस राष्ट्रीय कार्य समिती सदस्य के. राजू यांनी व्यक्त केली.तत्पूर्वी सकाळ च्या सत्रात के राजू यांनी संविधानाचे महत्व सांगून संविधानाने दिलेल्या अधिकारावर प्रकाश टाकला. काँग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी अनुसूचित जातीच्या पदाधिकाऱ्याने कंबर कसून कामाला लागलं पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आत्मसात करा असा संदेश राजू यांनी दिला.काँग्रेस पक्षात अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्याला अपमानित केले तर काँग्रेस चे नुकसान होईल – राजेश लिलोठीया काँग्रेस पक्ष अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्याला न्याय न देणे, त्याला अपमानित करणे म्हणजे अप्रत्यक्ष काँग्रेस पक्षाचेच नुकसान आहे, म्हणून काँग्रेस पक्षाचे कार्य प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय द्या अशा कानपिचक्या राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया यांनी नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांचेसमोर दिल्या.हा कार्यकर्ता गरीब आहे पण इमानदार आहेत, सच्चे आहेत पण सन्मान आणि स्वाभिमान कधीही सोडणार नाहीत. कार्यकर्त्यांचे काम असेल तर त्याला त्याचा हिस्सा द्या अशी भूमिका मांडली.महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना संबोधित करतांना लिलोठीया म्हणाले, तुमच्या रक्तात भीमा कोरेगाव चा लढाऊ इतिहास आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांना कधीही विसरू नका, त्यांच्या विचारांना समर्पित काम करा असा संदेश त्यांनी दिला
भारतीय संविधानाविरुद्ध वागणाऱ्या भाजप आर एस एसला 2024 मध्ये गाडणार – डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे
महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाने एक नवा झंझावात निर्माण केला असून मुख्य काँग्रेसने सर्वसामान्य अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांना सन्मान दिल्यास आम्ही आपणास इतर कोणत्याही पक्षाची गरज पडू देणार नाही. 6 जागा लोकसभा व 27 जागा विधानसभेच्या आरक्षित आहेत त्या सर्व जागा आम्ही लढवून भाजप ला धूळ चारू असा विश्वास समारोपरिय कार्यक्रमात व्यक्त केला
यावेळी मनोज बागडी यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास कुणाल राऊत युवक प्रदेशाध्यक्ष,राजू वाघमारे, माजी आ. विजय खडसे, मिलिंद रामटेक,राजेश लाडे, आ. लहू कानडे, संजय राठोड, तेजेंद्र सिंग चव्हाण,अमर खानापुरे, महेंद्र गवई, विनायबोधी डोंगरे, अश्विनी खोब्रागडे, कचरू यादव, सुजित आप्पा यादव, ऍड राहुल साळवे, गौतम गवई, प्रवीण सुरवाडे, बंटी यादव संजय भोसले, अभिजित मेश्राम, राज वाल्मिकी, नंदकुमार गोरे, महेंद्र कावळे, प्रमोद अवसरमोल कृष्णा भंडारे इत्यादीसह राज्य भरातून 700 पदाधिकारी उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या शिबिराचा समारोप झाला. सूत्रसंचालन डॉ पवनकुमार डोंगरे यांनी केले.