प्रत्येक शेतक-याने गावातील पाणी गावात आणि शेतातील पाणी शेतात सिंचीत करण्यासाठी प्रयत्न करावेत – केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर पाटील
प्रत्येक शेतक-याने गावातील पाणी गावात आणि शेतातील पाणी शेतात सिंचीत करण्यासाठी प्रयत्न करावेत – केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर पाटील

प्रत्येक शेतक-याने गावातील पाणी गावात आणि शेतातील पाणी शेतात सिंचीत करण्यासाठी प्रयत्न करावेत – केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर पाटील
कालव्यांच्या कामासाठी मंत्री विखे पाटील यांच्या पाठपुराव्यातून महायुती सरकारने ११० कोटी रुपये मंजुर
राहाता । प्रतिनिधी । कोणतेही गाव आणि शेत पाण्यापासून वंचित राहू नये असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. त्याची पुर्तता करण्यासाठी केंद्र शासन कटीबध्द असून, नैसर्गिकरित्या जलसंचय करण्यासाठी शासनाच्या बरोबरीने लोकांनीही आता पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर पाटील यांनी केले.

तालुक्यातील गोदावरी उजव्या कालव्याच्या नूतणीकरणाचा शुभारंभ मंत्री सी.आर पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कालव्यांच्या कामासाठी मंत्री विखे पाटील यांच्या पाठपुराव्यातून महायुती सरकारने ११० कोटी रुपये मंजुर केले आहेत. या प्रसंगी खा.धनंजय महाडीक, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आ.आशुतोष काळे, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिपक कपुर, डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासह गोदावरी पाटबंधारे विभागातील सर्व आधिकारी आधि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्या भाषणात जलशक्ती मंत्री सी.आर पाटील म्हणाले की, संपूर्ण जगाच्या अठरा टक्के लोकसंख्या आणि तेवढेच पशुधन हे भारतात आहे. मात्र जगाच्या आकडेवारीचा विचार केला तर, आपल्याकडे फक्त चार टक्के पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे आता पाण्याचे नियोजन करण्याशिवाय पर्याय नाही असे स्पष्ट करुन देशात दरवर्षी सुमारे ४ हजार बीसीएम इतके पावसाचे पाणी मिळते. आपल्याला फक्त १ हजार१२० बीसीएम पाण्याची गरज आहे. यापैकी फक्त ७५० बीसीएम पाणी आपण साठवतो. तरीही पाण्याची कमतरता का आहे याचाही आता गांभिर्याने विचार करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

एक धरण उभारायला २५ ते ३० वर्ष लागत असतील तर ते योग्य नाही. कारण तेवढा वेळ थांबणेही आता शक्य नाही. येणा-या सर्व परिस्थितीवर मात करण्याचे प्रयत्न शासन व्यवस्था करीत असते. पण तुम्ही शेतकरी काम करणार असा प्रश्न करुन, पाटील यांनी सांगितले की, आता प्रत्येक शेतक-याने गावातील पाणी गावात आणि शेतातील पाणी शेतात सिंचीत करण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतामध्ये चार बाय सहा फुट खड्डा खोदून नैसर्गिक रित्या जलसिंचन करण्याची सुरुवात करावी.देशात अशा पध्दतीने १३ लाख स्ट्रक्चर उभे राहीले आहेत. ही चळवळ आता आपल्याला अधिक वाढवावी लागेल. यातून निश्चित लाखो लिटर पाण्याची बचत होईल असा विश्वास व्यक्त करुन, नदी नाल्यांवरील पुराचे पाणी आता कॅनमध्ये आणण्याची वेळ येवू नये यासाठी पाणी बचतीची चळवळ अधिक गांभिर्याने घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नदीजोड प्रकल्पातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे. उपलब्ध पाण्यातून शेतीचे सिंचन झाले पाहीजे. नदीजोड प्रकल्पाचे स्वप्न खासदार डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहीले होते. ते स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आली आहे. यासाठी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातून सी.आर पाटील यांचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे. गोदावरी उजव्या कालव्याबरोबरच डाव्या कालव्याचेही नूतणीकरण सुरु करण्यात येणार असून, डिसेंबर २०२६ पर्यंत हे काम पुर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी आ.आशुतोष काळे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांचीही भाषण झाली. राज्य सरकारने मागील काही वर्षात राज्यातील १८२ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून, यातून २५ लाख ७८ हजार क्षेत्र ओलीताखाली आले असल्याची माहीती अतिरिक्त मुख्य सविच दिपक कपुर यांनी आपल्या भाषणात दिली.



