ब्रेकिंग

भागवत कथा श्रवण केल्याने मनुष्याच्या जीवनातील व्यथा दूर होतात – ह.भ.प.परमपूज्य देवगोपाल शास्त्री महाराज

अंजनापुर येथे भागवत कथेस महिलांची उच्चांक गर्दी

जाहिरात
भागवत कथा श्रवण केल्याने मनुष्याच्या जीवनातील व्यथा दूर होतात – ह.भ.प.परमपूज्य देवगोपाल शास्त्री महाराज

भागवत कथा श्रवण केल्याने मनुष्याच्या जीवनातील व्यथा दूर होतात – ह.भ.प.परमपूज्य देवगोपाल शास्त्री महाराज

अंजनापुर येथे भागवत कथेस महिलांची उच्चांक गर्दी

कोपरगाव । प्रतिनिधी । श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने मनुष्याच्या जीवनातील व्यथा दूर होतात म्हणून सर्वांनी भागवत कथा श्रवण करावी असे हभप देवगोपाल शास्त्री महाराज यांनी कै बिजलाबाई मारूतीराव व लोकनेते कै.मारूतीराव सखाराम पा.गव्हाणे यांचा पुण्यतिथी निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथील म्हसोबा वस्ती येथे आरोग्यदुत बाळासाहेब गव्हाणे व मित्र परिवाराच्या वतीने आयोजित संगीतमय भागवत कथेचे पाचवे पुष्प गुंफतांना उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.

गेल्या ४ दिवसापासून सुरू असलेल्या संगीत मय भागवत कथेस गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, कोपरगाव तालुका भाजपा अध्यक्ष कैलास राहाणे, सिनेअभिनेते हंसराज जगताप, शिर्डीचे माजी नगरसेवक तुषार गोंदकर, कोपरगाव माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब राहाणे आदी सह परिसरातील सर्वच गावचे सरपंच, उपसरपंच, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी देत कथेचे श्रवण करत आरोग्यदूत गव्हाणे यांचे कौतुक करत अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन केले.

या प्रसंगी महाराजांनी भागवत कथा श्रवण करणाऱ्या सेवकाचे शास्त्रीय नियमाचे विवेचन केले.भागवताची निर्मिती कशी झाली त्याचे वर्णन त्यांनी केले. कलयुगात मोक्ष प्राप्ती करण्याचा सोपा मार्ग भागवत आहे. हे श्रवण करण्यासाठी जन्मोजन्मीचे पुण्य असावं लागतं. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांचा समन्वय भागवतात आहे. व्यासांनी १७ पुराणे लिहून पूर्ण केल्यानंतर त्यांना समाधान झाले नाही. म्हणून भागवताची निर्मिती त्यांनी केली. सर्व वेद, उपनिषदांचे लिखाण केले. याचे लिखाण करतांना त्यांनी चारही वेदांचे सार भागवतात त्यांनी लिहले आहे. म्हणून वेद वृक्षाचे परिपक्व फळ म्हणजे भागवत आहे. भागवताचे श्रवण हे भूलोकासाठी आहे. दुसऱ्या कोणत्याही लोकांस मिळालेले नाही.भक्ताच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी भगवान परमात्मा सदैव तत्पर असतात मात्र त्यासाठी आपल्या मुखात त्याचे नामस्मरण आले पाहिजे. मनाला सुमन बनवा म्हणजे भगवंत त्यात वास करेल जीवन क्षणभंगुर आहे हे प्रत्येकाला ज्ञात होऊनही हाव सुटत नाही.
माया मनुष्याला एकमेकांच्या नात्यापासुन दूर करत असते तिच्या किती अधीन जायचे हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे. मायेच्या पलिकडेही वेगळी दुनिया आहे त्याच्या प्रवासासाठी साधना, नामस्मरण खुप महत्वाचे असल्याचे महाराजांनी सांगितले. गेल्या ५ दिवसापासून सुरू असलेल्या या कथेस परिसरातील महिला भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळत असून या सर्वांना कथा संपल्यानंतर दररोज महाप्रसादाचे वाटप केल्या जाते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!