प्रा नितीन साळवे यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान

प्रा नितीन साळवे यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान
प्रा नितीन साळवे यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान
कोपरगांव । प्रतिनिधी । रयत शिक्षण संस्थेचे, चंद्ररूप डाकले जैन महाविद्यालय श्रीरामपूर येथील वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्रातील नितीन बाळासाहेब साळवे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फत नुकतीच पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.प्रा. नितीन साळवे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयामध्ये “अ स्टडी ऑफ इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी बिझिनेस इन नॉर्थ महाराष्ट्र” हे शिर्षक घेऊन शोध प्रबंध सादर केला. या शोध प्रबंधाचा फायदा हा महाराष्ट्रातील पर्यटन प्रवाह वाढीसाठी, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि एकत्रीकरणासाठी, पायाभूत सुविधांची सुधारिकरण होण्यासाठी, रोजगार निर्मिती होण्यासाठी तसेच नवीन संशोधकांना स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ कशी होते व स्थानिक व्यवसायांसमोरील आव्हाने ओळखून पुढील संशोधन करणे सोपे होईल. अशा विविध अंगांनी हा शोध प्रबंध समाजाला फायदेशीर ठरणार आहे.
त्यांना गाईड म्हणून पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व प्राचार्य डॉ. एस.आर. बखळे व को-गाईड म्हणून डॉ. व्ही. बी. निकम यांचे मार्गदर्शन लाभले. गठीत कमिटीत चेअरमन म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित सेंट विन्सेंट कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य डॉ.अडसुळे ए .बी. तसेच रेफरी म्हणून नांदेड विद्यापीठ संलग्नित के.आर.के. आणि बी.आर.एम. सी.कॉलेज मानवत, नांदेड येथील डॉ. बी.एस. गीते, सी. डी.जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर येथील प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर व वाणिज्य विभागप्रमुख डॉ. अनिकेत खत्री यांच्या उपस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागात पीएच.डी व्हायवा ओईस पार पडली.

त्यांचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हॉईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे,सदस्य मीनाताई जगधने, उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, संस्थेचे सचिव विकास देशमुख, सहसचिव प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्र. प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, डायरेक्टर डॉ. बी.एस. सावंत, प्राचार्य डॉ. एम. टी. सरोदे, प्राचार्य डॉ. के एच. शिंदे, माजी प्राचार्य डॉ. जी. टी. सांगळे, माजी प्राचार्य डॉ. पी.एन.गायकवाड, माजी प्राचार्य डॉ. एल.डी.भोर, डॉ. बी.बी.निघोट, प्र. प्राचार्य डॉ. के.पी.काकडे, माजी प्राचार्य डॉ. आर.आर.सानप, प्राचार्य डॉ. सी.जे. खिलारी, प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, उपप्राचार्य डॉ. मोहन सांगळे, डॉ. एम. ए. केकाने, डॉ. सादिक सय्यद, डॉ. एस.एस.भोला, उद्योजक किरण माणिकराव पगार आदींसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.