ब्रेकिंग

अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये ‘अमृतवाहिनी टॅलेंट हंट 2K25’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये ‘अमृतवाहिनी टॅलेंट हंट 2K25’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये ‘अमृतवाहिनी टॅलेंट हंट 2K25’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

संगमनेर । प्रतिनिधी । अमृतवाहिनी तंत्रनिकेतन, संगमनेर येथे ‘अमृतवाहिनी टॅलेंट हंट 2K25’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी संगमनेर तालुक्यासह परिसरातील विविध शाळांमधून एकूण १२०० विद्यार्थी सहभागी झाले.

स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. कारवा यश दीपक – श्री.श्री.रविशंकर मंदिर, संगमनेर प्रथम क्रमांक 5000/- रोख ट्रॉफी सर्टिफिकेट, नवले आदिती सुनील – श्रमशक्ती माध्यमिक विद्यालय, मालदाड  द्वितीय क्रमांक 3000/- रोख ट्रॉफी सर्टिफिकेट, आहेर समीक्षा मीनानाथ – इनोवेटर्स पब्लिक स्कूल, चंदनापुरी तृतीय क्रमांक 2000/-रोख,ट्रॉफी सर्टिफिकेट, उत्तेजनार्थ पुरस्कार विजेते: (प्रत्येकी 1000/- रोख सर्टिफिकेट) देशमुख जान्हवी संदीप वसुंधरा अकॅडमी अकोले, राऊत आयुष भागवत – अमृतवाहिनी मॉडेल स्कूल, संगमनेर विभागून (500/- रोख सर्टिफिकेट), मुरकुटे श्रुती किशोर – जिजामाता माध्यमिक विद्यालय, भेंडा नेवासा, विभागून (500/- रोख सर्टिफिकेट), वरपे प्रतीक संजय – निळकंठेश्वर आदर्श विद्यालय, निमगाव टेंभी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.डी.एस.फापाळे, प्रा.सी.डी.पावसकर, प्रा.एस.एस.तळेकर आणि प्रा.व्ही.डी.कांडूरे यांनी काम पाहिले. रजिस्ट्रेशन प्रा.एस यू कडलग व प्रा.डी.आर.जोंधळे तसेच ऑनलाईन परीक्षेचे नियोजन प्रा.एस एन वावळे, प्रा.एस.एस.सातपुते आणि प्रा. के.आर.कोल्हे यांनी केले, तर ऑफलाईन परीक्षेचे नियोजन प्रा.बी.जी.कुटे, प्रा.बी.के.उगले आणि प्रा. ए.बी.शिंदे यांनी केले.

पारितोषिक वितरण समारंभ प्राचार्य व्ही.बी.धुमाळ आणि उपप्राचार्य जी.बी.काळे यांच्या हस्ते पार पडला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रा. डी. डी. उगले आणि प्रा. एस. एस. देशमुख यांनी केले. सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त मा.डॉ.सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त मा.शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आणि डायरेक्टर अकॅडेमिक डॉ.जे.बी.गुरव यांनी विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!