थोरात कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील को -जनरेशन अवॉर्ड
सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार

संगमनेर (प्रतिनिधी) -काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला वीज निर्मितीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल को जनरेशन 2024 हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करताना शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण केली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आदर्श तत्त्वावर कारखान्याची वाटचाल सुरू असून कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला आहे. कारखान्यावर सभासद ऊस उत्पादक व कार्यक्षेत्राबाहेर ऊस उत्पादक यांचाही मोठा विश्वास असून यावर्षी सुद्धा दहा लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. ऊस गाळपाबरोबर कारखान्याने वीज निर्मितीमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे या कामगिरीची दखल घेऊन नॅशनल को जनरेशन फेडरेशनच्या वतीने स्पेशल कॅटेगिरी मधून सातत्यपूर्ण कामगिरीचा नॅशनल को जनरेशन पुरस्कार 2024 या कारखान्यासाठी जाहीर झाला आहे यापूर्वीही या पुरस्काराने थोरात कारखान्याचा दिल्ली येथे सन्मान झाला आहे.
हा पुरस्कार सांघीक कामाचे यश असून यामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हाईस चेअरमन संतोष हासे, सर्व संचालक मंडळ ,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर सर्व विभाग प्रमुख, वीज निर्मिती विभाग यांचे योगदान राहिले आहे. कारखान्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, डॉ.जयश्रीताई थोरात, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, सौ दुर्गाताई तांबे सुधाकर जोशी संपतराव डोंगरे शंकरराव खेमनर रामहरी कातोरे हौशीराम सोनवणे कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ संतोष हासे , कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींनी अभिनंदन केले आहे