ब्रेकिंग
एकविरा फाउंडेशन च्या वतीने यशोधन कार्यालयात महिलांसाठी मोफत फायर अँड सेफ्टी प्रशिक्षण

एकविरा फाउंडेशन च्या वतीने यशोधन कार्यालयात महिलांसाठी मोफत फायर अँड सेफ्टी प्रशिक्षण

एकविरा फाउंडेशन च्या वतीने यशोधन कार्यालयात महिलांसाठी मोफत फायर अँड सेफ्टी प्रशिक्षण
संगमनेर । प्रतिनिधी । लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या व डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला व तरुणींसाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. त्याचाच एक भाग म्हणून महिलांसाठी मोफत फायर अँड सेफ्टी चे प्रशिक्षण आज यशोधन कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. यशोधन कार्यालय झालेल्या कार्यक्रमात सूर्या गॅस कंपनीचे राजू थोरात व संतोष रुपवते यांनी फायर अँड सेफ्टी बाबत प्रशिक्षण दिले. यावेळी सौ अर्चनाताई बालोडे, नयनाताई राहणे, शीतल उगलमुगले, बेबीताई थोरात, दिपालीताई वर्पे, प्रमिलाताई अभंग, सुविधा आरसिद्ध,अमृता राऊत आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिला सबलीकरण व सक्षमीकरण करणे हा एकविरा फाउंडेशनचा प्रमुख उद्देश असून महिला व युवतींना वेगवेगळ्या विषयांची माहिती असणे आवश्यक आहे या उद्देशाने अतिशय महत्त्वाच्या अशा फायर अँड सेफ्टी बाबत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी राजू थोरात व संतोष रुपवते यांनी महिलांना घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर कसा वापरावा, अशाप्रकारे काळजी घ्यावी, गॅस गळती व दुर्घटना होण्याची प्रमुख कारणे व त्यावरील उपाय, गॅसची बचत आणि सुरक्षितता, गॅस मुळे होणारे अपघात व दुर्घटना टाळण्यासाठी काय करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. व एकवीरा फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे कौतुकही केले. यावेळी सौ सुनीता कांदळकर यांनी एकविरा फाउंडेशनच्या आजपर्यंतच्या कामकाजाविषयी कार्यपद्धती बाबत माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला हांडे मॅडम यांनी केले तर आभार सुनीता कांदळकर यांनी मानले. यावेळी अनेक महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.