ब्रेकिंग
अमृतवाहिनी आयटीआयच्या 29 विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा पूर्वी मेगाकोट सरफेस ट्रीटमेंट कंपनीत निवड

अमृतवाहिनी आयटीआयच्या 29 विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा पूर्वी मेगाकोट सरफेस ट्रीटमेंट कंपनीत निवड

अमृतवाहिनी आयटीआयच्या 29 विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा पूर्वी मेगाकोट सरफेस ट्रीटमेंट कंपनीत निवड
संगमनेर । प्रतिनिधी । अमृतवाहिनी आयटीआय अमृतनगर संगमनेर येथे दिनांक 21 मे 2025 रोजी मेगाकोट सरफेस ट्रीटमेंट सिन्नर, नाशिक येथील कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू नुकताच पार पडला असून यात 29 विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वी थेट निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य विलास भाटे यांनी दिली आहे याविषयी अधिक माहिती देताना भाटे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आ. डॉ. सुधीर तांबे आणि संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी आयटीआय ने सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. संस्थेमध्ये नोकरी करिता स्वतंत्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग कार्यरत असून या विभागाच्या वतीने विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी समन्वय करार करण्यात आला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता अमृतवाहिनीच्या 29 विद्यार्थ्यांची मेगाकोट सरफेस ट्रीटमेंट या कंपनीमध्ये निवड झाली आहे.

मेगाकोट सरफेस ट्रीटमेंटचे श्री संदीप सायखिंडीकर( डी.जी.एम ऑपरेशन), संग्राम जाधव ( एच.आर. हेड) यांनी अंतिम वर्षाच्या मेकॅनिक मोटर व्हेईकल ,मेकॅनिक डिझेल, फिटर इलेक्ट्रिशियन, वायरमन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेडच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यापैकी 29 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत निसर्गरम्य सुंदर परिसर, अत्याधुनिक सुविधा आणि प्लेसमेंट साठी परिपूर्ण प्रयत्न असल्याने संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या पगारावर थेट नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात ,विश्वस्त मा. आ. डॉ सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे , प्राध्यापक व्ही.बी धुमाळ अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव, प्राचार्य विलास भाटे आदींनी अभिनंदन केले आहे.