” माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या दूरदृष्टीतून जलसमृद्धी !”
निळवंडेचे पाणी शेतात पोहोचताच संगमनेरमध्ये जल्लोष; गावागावात जलपूजन, मिरवणुका आणि आनंदोत्सव !


” माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या दूरदृष्टीतून जलसमृद्धी !”

” माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या दूरदृष्टीतून जलसमृद्धी !”
निळवंडेचे पाणी शेतात पोहोचताच संगमनेरमध्ये जल्लोष; गावागावात जलपूजन, मिरवणुका आणि आनंदोत्सव !

निळवंडे च्या पाण्याचे गावागावांमध्ये जलपूजन, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका, फटाक्यांची आतषबाजी आणि युवकांचा आनंदोत्सव – हा उत्सव म्हणजे केवळ जलपूजन नव्हते, तर एका स्वप्नपूर्तीचा साक्षात साक्षात्कार होता. शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण होणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी मंत्री असताना विकासाचा आणि विशेषतः पाणी प्रकल्पांचा जो ध्यास घेतला, त्यातूनच निळवंडे धरण तसेच त्याला जोडलेले डावा आणि उजवा कालवे पूर्णत्वास गेले. या कार्यासाठी त्यांनी आमदारकी आणि मंत्रीपदाचीही तमा न बाळगता अविरत संघर्ष केला. त्यांच्या नेतृत्वामुळे आज दुष्काळी भागात पाणी पोहोचले असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात खराखुरा आनंद आला आहे.
गावोगावी उत्सवाचं वातावरणअंभोरे, पानोडी, मालुंजे, पिंपरणे, चिंचोली गुरव, वरझडी, कासारे, लोहारे देवकवठे , मीरपुर, हिवरगाव पावसा, निमगाव टेंभी, देवगाव, वाघापूर, खराडी आदी गावांमध्ये जलपूजनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. शेतकऱ्यांनी मातीला पाणी लागल्याचा आनंद अश्रूंनी व्यक्त केला. मिरवणुका, फटाके, ढोल-ताशा, नारे – या साऱ्या गोष्टींनी संपूर्ण परिसर न्हालून निघाला.

उजव्या कालव्यालगतच्या गावांना जलसिंचनाची सुविधा मिळावी यासाठी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून थोरात यांच्या पुढाकाराने सुमारे २ कोटी रुपये खर्चून पाइपलाइन बसवण्यात आली. या पाइपद्वारे कालव्याचे पाणी विविध बंधाऱ्यांमध्ये पोहोचवले गेले. परिणामी गावागावात जलपूजनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. हिवरगाव पावसा व घुलेवाडी येथे बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडलेल्या जलपूजन सोहळ्याला हजारोंच्या संख्येने ग्रामस्थांनी हजेरी लावली. ढोल-ताशांमध्ये निळवंडेच्या पाण्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की निळवंडे चे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने स्वप्नपूर्ती झाली आहे मात्र कालव्यांच्या वरच्या बाजूला जे शेतकरी आहेत त्यांच्या करता ही पाणी देण्यासाठी आराखडा केला आहे. सत्ता असून असो या पुढील काळात या शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील १८२ गावांमध्ये आणि तळेगाव गटातील दुष्काळी भागांमध्ये निळवंडे धरणाचे पाणी पोहोचावे यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धरणासह उजवा व डावा कालवा पूर्णत्वास नेले. त्यांच्या अथक प्रयत्नातून आज या कालव्यांमधून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत असून, हे एक प्रकारचे कार्यसिद्धीचे उदाहरण आहे. अजूनही ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळालेले नाही, त्यांच्या साठी आराखडा तयार करण्यात आला असून पुढील टप्प्यात कामे हाती घेतली जाणार आहेत. तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावे, हा त्यांचा संकल्प होता. सत्ता बदलल्याने काही अडथळे निर्माण झाले, तरीही थोरात सातत्याने पाठपुरावा करत आहेत. राज्यातील सर्वच मंत्र्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने विकासकामांमध्ये अडथळा येणार नाही.
– इंद्रजीत थोरात ( संचालक- थोरात कारखाना)