ब्रेकिंग
विद्यार्थ्यांना चोवीस तासाच्या आत शैक्षणिक दाखल्यांचे वितरण करा- तहसीलदार महेश सावंत

विद्यार्थ्यांना चोवीस तासाच्या आत शैक्षणिक दाखल्यांचे वितरण करा- तहसीलदार महेश सावंत
विद्यार्थ्यांना चोवीस तासाच्या आत शैक्षणिक दाखल्यांचे वितरण करा- तहसीलदार महेश सावंत
शिर्डी । विनोद जवरे । कोपरगाव तहसील कार्यालयात अर्ज प्राप्त झाल्यापासून चोवीस तासाच्या आत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यांचे वितरण करण्याच्या सूचना तहसीलदार महेश सावंत यांनी तालुक्यातील सेतू चालकांना दिल्या.

कोपरगाव तालुक्यातील सर्व सेतु, महा ई-सेवा केंद्रचालकाची बैठकीत ते बोलत होते. कोपरगांव तालुकयातील अर्जदारांना दाखल्यासंदर्भात कुठलाही ञास होता कामा नये, सर्व सेतूकेंद्र चालकांनी प्रमाणपत्रांसाठीची फी दर्शविणार फलक दर्शनी भागात लावावेत, लवकरच तालुक्यातील सर्व सेतूच्या कामकाजाची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेतूकेंद्रात अर्ज दाखल झाल्यावर त्याच दिवशी तो ऑनलाईन पोर्टलला अपलोड झालाच पाहिजे. बैठकीत तालुक्यातील सर्व सेतू केंद्र चालक उपस्थित होते.